Lalu Yadav convicted : चारा घोटाळ्याप्रकरणी पुन्हा अडचणी वाढल्या! लालू प्रसाद यादव दोषीच, आता किती वर्षांची शिक्षा?

Lalu Yadav convicted : Breaking News : जर लालू प्रसाद यादव यांनी तीन वर्षांची शिक्षा झाली, तर त्यांना जामीन मिळू शकतो, असंही सांगितलं जातंय. मात्र त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास लालू प्रसाद यादव यांना पुन्हा एकदा ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे.

Lalu Yadav convicted : चारा घोटाळ्याप्रकरणी पुन्हा अडचणी वाढल्या! लालू प्रसाद यादव दोषीच, आता किती वर्षांची शिक्षा?
लालूंच्या अडचणीत पुन्हा मोठी भर; जामीनावर सुप्रीम कोर्ट करणार सुनावणीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 12:47 PM

चारा घोटाळ्याप्रकरणी (Chara Scam) लालू प्रसाद यादव यांना अखेर दोषी (Lalu Yadav convicted) ठरवण्यात आलं आहे. 139 कोटी रुपयांचा हा घोटाला असून आता लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दरम्यान, अद्याप या घोटाळ्याप्रकरणी दोषी असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावरील शिक्षेची सुनावणी झाली नसून, त्यांना नेमकी काय शिक्षा सुनावली जाते, हे पाहणं आता महत्त्वाचंय. जर लालू प्रसाद यादव यांनी तीन वर्षांची शिक्षा झाली, तर त्यांना जामीन (Lalu Prasad Bail) मिळू शकतो, असंही सांगितलं जातंय. मात्र त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास लालू प्रसाद यादव यांना पुन्हा एकदा ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांना काय शिक्षा होणार याची सुनावणी 21 तारखेला होणार आहे.

आतापर्यंतचा रेकॉर्ड काय?

दरम्यान, आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता चारा घोटाळ्याप्रकरणाशी संबंधित आधीच्या गुन्ह्यांमध्ये लालू प्रसाद यादव यांना तीन वर्षांपेक्षा जास्तच शिक्षा सुनावण्यात आली होती. चारा घोटाळ्याप्रकरणाशी संबंधित आरोपांखाली लालू प्रसाद यादव यांना तब्बल 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

सोबतच त्याला 60 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. लालू प्रसाद यादव हे सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आले असून आता पुन्हा त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

बेल की जेल?

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती सध्या चांगली नसल्यानं त्यांना दिलासा मिळू शकतो, असंही बोलल जातंय. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना जामीन मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र याआधी सीबीआय कोर्टानं लालू प्रसाद यादव यांना दिलासा दिला नव्हता.

चारा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादव यांना पाच ते सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टात लालू प्रसाद यादव यांनी दाद मागितली होती. तेव्हा त्यांना अल्पसा दिलासा मिळाला होता. दरम्यान, आता पुन्हा लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे चारा घोटाळा?

प्राण्यांच्या चारा, औषधं आणि पशुपालनासाठीच्या उपकरणांचा घोटाळा करण्यात आला. 900 कोटींचा हा घोटाळा 1996 साली उघडकीस आला होता. तेव्हाचे बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे या घोटाळ्याचे प्रमुख आरोपी होते. 29 जून 1997 मध्ये लालूंविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. 12 डिसेंबर 1997 मध्ये त्यांची सुटकाही करण्यात आली . 28 ऑक्टोबर 1998 मध्ये त्यांनी पुन्हा अटक करण्यात आली. मार्च 2012 मध्ये सीबीआयकडून पुन्हा चारा घोटाळ्याचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. 2013सालली लालूंना पुन्हा पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली दरम्यान, सध्या लालू प्रसाद यादव हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुरुंगाबाहेर आहेत.

संबंधित बातम्या :

‘ते माझ्यासोबत फ्लर्ट करायला लागलेले’, लालूंच्या मुलाखतीनंतर पाकिस्तानी अँकरची प्रतिक्रिया, वाचा सविस्तर

लालू प्रसाद यादवांनी नव्या सूनबाईचं नाव बदललं; तेजस्वी यादवांच्या पत्नीचं नवं नाव नेमंक काय?

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.