Chandrayaan – 3 च्या लॅंडरने चंद्र आणि पृथ्वीचे पुन्हा फोटो पाठविले, सुरक्षित लॅंडींगसाठी लॅंडरचे कॅमेरे सज्ज
चंद्रयान-3 सध्या चंद्राला तिसऱ्या ऑर्बिटमध्ये ( कक्षा ) लंबवर्तुळाकार प्रदक्षिणा घालत आहे. त्याची कक्षा 174 किमी बाय 1437 किमी आहे. त्याच्या विक्रम लॅंडरला लावलेल्या कॅमेऱ्याने ताजी छायाचित्रे पाठविली आहेत.
मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : भारताच्या महत्वाकांक्षी चंद्रयान-3 ने 14 जुलै 2023 रोजी जीएसएलव्ही-एके3 रॉकेटमधून उड्डाण घेतले होते. त्यानंतर जेव्हा चंद्रयान-3 अंतराळात पोहचले तेव्हाच त्याच्या लॅंडरला लावलेल्या लॅंडर इमेजर ( एलआय ) कॅमेरऱ्यांनी निळ्याशार पृथ्वीचे फोटो काढले. निळी पृथ्वीला पांढऱ्या ढगांच्या चादरीने जणू झाकावे असे विहंगम दृश्य यात दिसत आहे. काल चंद्रयान-3 ने अजून फोटो पाठवू का ? असे इस्रोला विचारले होते. 5 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत गेले त्यावेळी लॅंडरच्या दुसरा कॅमेरा लॅंडर हॉरिझोंटल वेलोसिटी कॅमेरा – LHVC ने चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे काढली. LI कॅमेऱ्यांना गुजरातमधील स्पेस एप्लीकेशन सेंटरने तयार केले आहे.
लॅंडर हॉरिझोंटल वेलोसिटी कॅमेरा ( LHVC ) बंगळुरुच्या लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रो -ऑप्टीक्स सिस्टम्स ( LEOS ) ने तयार केले आहे. LHVC विक्रम लॅंडरच्या खालील बाजूला लावलेला कॅमेरा आहे. त्यामुळे जो जमिनीचे भागाचे फोटो काढू शकतो. यान वेगाने फिरत असताना ही सुस्पष्ट फोटो काढण्याची त्याची क्षमता आहे. लॅंडर उतरता किंवा हॅलिकॉप्टरसारखे हवेत तरंगताना त्याच्या वेगाचा अंदाज त्यामुळे घेता येतो. तसेच पुढील धोके ओळखता येतात.
चंद्रयान-3 सध्या चंद्राला तिसऱ्या ऑर्बिटमध्ये ( कक्षा ) लंबवर्तुळाकार प्रदक्षिणा घालत आहे. त्याची कक्षा 174 किमी बाय 1437 किमी आहे. 5 ऑगस्टला चंद्रमाच्या पहिल्या कक्षेत चंद्रयान पोहचले तेव्हा त्याने चंद्राची पहिली प्रतिमा पाठविली होती. तेव्हा चंद्रयान चंद्राभोवती 1900 किमी प्रति सेंकद गतीने 164 किमी बाय 18074 किमी अंडाकार ऑर्बिटमध्ये प्रवास करत होते. ज्यास नंतर घटवून 6 ऑगस्ट रोजी 170 बाय 4313 किमी कक्षेत टाकण्यात आले.
इस्रोचे ट्वीट येथे पाहा –
Chandrayaan-3 Mission: ? viewed by Lander Imager (LI) Camera on the day of the launch & ? imaged by Lander Horizontal Velocity Camera (LHVC) a day after the Lunar Orbit Insertion
LI & LHV cameras are developed by SAC & LEOS, respectively https://t.co/tKlKjieQJS… pic.twitter.com/6QISmdsdRS
— ISRO (@isro) August 10, 2023
चंद्राच्या खड्ड्यांपासून वाचवणार कॅमेरे
चंद्रावर सुमारे 14 लाख खड्डे आहेत. 9137 क्रेटरची ओळख झाली असून 1675 क्रेटरचे आयुष्य समजले आहे. परंतू अनेक विवरांचा अजूनही मानवाला पत्ता लागलेला नाही. काही विवरं ज्वालामुखींमुळे झाली आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या विवराचा काही अंदाज नसल्याने सॉफ्ट लॅंडींग जिकरीचे आहे. चंद्रावर लॅंडींग करताना विक्रम लॅंडरचे कॅमेरे इस्रोला मदत करणार आहेत. त्यामुळे चंद्रयान-3 यशस्वी लॅंडींग करेल असा इस्रोला विश्वास आहे.
आता काय घडणार
14 ऑगस्ट 2023 : स. 11.45 ते 12.04 चौथ्या कक्षा बदलली जाईल
16 ऑगस्ट 2023 : स.8.38 ते 8.39 दरम्यान पाचवी कक्षा बदलली जाईल, म्हणजे केवळ एक मिनिटासाठी त्याचे इंजिन सुरु केले जाईल.
17 ऑगस्ट 2023 : चंद्रयान-3 प्रोपल्शन आणि लॅंडर मॉड्यूल स्वतंत्र होतील. या दिनी दोन्ही मॉड्यूल चंद्राच्या भोवती 100 किमी बाय 100 किमी गोलाकार फिरतील
18 ऑगस्ट 2023 : दु. पावणे चार वा.लॅंडर मॉड्यूलची डीऑर्बिटींग होईल. म्हणजे त्याच्या कक्षेची उंची कमी केली जाईल.
20 ऑगस्त 2023 : चंद्रयान-3 लॅंडर मॉड्यूलची रात्री पावणे दोन वाजता डीऑर्बिटींग होईल.
23 ऑगस्त 2023 : लॅंडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लॅंड करेल. सर्वकाही सुरळीत झाले तर पावणे सहा वाजता लॅंडर चंद्रावर उतरेल.