Larsen & Toubro कंपनी राम मंदिर बांधणार, Tata Consultancy सल्लागार राहणार : विहिंप

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पुढील तीन वर्षांमध्ये पूर्ण होईल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केला आहे

Larsen & Toubro कंपनी राम मंदिर बांधणार, Tata Consultancy सल्लागार राहणार : विहिंप
अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडेलचे फोटो तीर्थक्षेत्राने ट्विटरवर जाहीर केले आहेत
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 9:40 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. लवकरच या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. पुढील तीन वर्षांमध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केला आहे. मंदिराचे बांधकाम लार्सन अँड ट्युबरो (Larsen & Toubro) कंपनी करणार असून Tata Consultancy ही कंपनी सल्लागार म्हणून काम पाहणार आहे. (Larsen & Toubro Company to build Ram Mandir)

विहिंपने म्हटले आहे की, राम जन्मभूमीसंदर्भातील सत्य सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आहे. अखेर आता बांधकामाला सुरुवात होणार आहे. दोन एकरपेक्षा जास्त जमिनीवर मंदिर उभारलं जाणार आहे. आमची इच्छा होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामाची पायाभरणी करावी, पंतप्रधानांनी आमची मागणी मान्य करत पायाभरणी करण्याचे मान्य केले. मंदिराच्या निर्मितीसंदर्भात लार्सन आणि ट्युबरो कंपनीशी चर्चा केली आहे. हीच कंपनी मंदिराचे बांधकाम करणार आहे. तर टाटा कन्सल्टन्सी कंपनी सल्लागार म्हणून काम पाहणार आहे.

मंदिर उभारणीच्या कामापूर्वी तांत्रिक तयारी सुरु झाली आहे. उदाहरणार्थ माती कशी आहे, 200 मीटरपर्यंत रेती आहे. त्यामुळेच याबाबत विविध कंपन्यांशी चर्चा केली जात आहे. एका आठवड्यात त्याबाबतची माहिती घेतली जाईल. त्यानंतर ठोस कामाला सुरुवात केली जाईल. त्यानंतर जवळपास 3 वर्षांमध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल. देशाच्या तरुण पिढीला आम्ही राम मंदिराचा इतिहास आणि त्याची माहिती देणार आहोत. लोकांनीही मंदिराच्या कामात सहकार्य करावे.

दरम्यान विहिंपकडून सांगण्यात आले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा अयोध्येत गेले होते, तेव्हा त्यांनी राम मंदिराला 3 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी एक कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन झालं आहे. तसेच मोरारी बापू यांच्याकडून 11 कोटी रुपये आले आहेत. अनेक लोक आर्थिक मदत करत आहेत.

संबंधित बातम्या

‘राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध’! निर्वाणी आखाडाचे महंत धर्मदास यांचा आरोप, गृह मंत्रालयाला कायदेशीर नोटीस

Ayodhya : राम मंदिर ट्रस्टला 200 किलो चांदीची देणगी, चांदीदान थांबवण्याची वेळ

Ayodhya Ram Mandir | राम मंदिराचं निर्माण हे भाजपचं स्वप्न : लालकृष्ण आडवाणी

(Larsen & Toubro Company to build Ram Mandir)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.