ब्रेकिंग! पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीनं डोकं वर काढलं, गेल्या 24 तासांतली आकडेवारी बघाच

India Corona tally: केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यात 70 टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू हे कोमॉर्बिड (अन्य आजार) लोकांचे असल्याचं म्हटलंय.

ब्रेकिंग! पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीनं डोकं वर काढलं, गेल्या 24 तासांतली आकडेवारी बघाच
भारतात 2,380 कोरोना रूग्णांची नोंदImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 10:01 AM

नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णवाढीनं (India Corona cases) पुन्हा एकदा डोक वर काढलंय की काय, असा प्रश्न गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीमुळे पडू लागला आहे. कारण गेल्या 24 तासात देशात 1 हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर देशात पडली आहे. त्याआधी सोमवारी 2 हजार 183 नव्या रुग्णांची (Corona new cases) भर पडली होती. दरम्यान, गेल्या 24 तासांत 928 लोक बरे झाले आहेत. तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4,30,45,527 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. सध्या देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. देशाता 11,860 सक्रिय कोरोना रुग्णांवर (Active cases) सध्या उपचार सुरु आहेत. तर मृतांची संख्या आता 5,21,966 इतकी झाली आहे. अल्प प्रमाणात का असेना, पण पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढ होत असल्याचं आकडेवारीवरुन पाहायला मिळतंय. ही वाढ चिंताजनक नसलीही तरीही काळजी घेण्याची गरजही व्यक्त होतेय.

केंद्रीय मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार…

  1. पॉझिटिव्हिटी रेट 0.03 टक्के
  2. रिकव्हरी रेट 98.76 टक्के
  3. किती जण बरे झाले? 4,25,11,701
  4. मृत्यूदर – 1.21
  5. लसवंत – 186.72 कोटीपेक्षा अधिक

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यात 70 टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू हे कोमॉर्बिड (अन्य आजार) लोकांचे असल्याचं म्हटलंय. सध्याच्या घडीला कोरोना लसीकरणावर भर देणं, हाच कोरोनाला रोखण्यासाठीचा प्रमुख उपाय असल्याचंही सांगितलं जातंय. 21 जून 2021 पासून सगळ्यांसाठी लस उपलब्ध करुन देण्यात आली होती. जास्तीत जास्त लोकसंख्या ही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली असावी, या उद्देशानं केंद्र आणि राज्य सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहेत.

4 कोटीपेक्षा जास्त रुग्ण

देशानं जानेवारी महिन्यात कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येचा आकडा हा चार कोटीच्या पार ओलांडला होता. कोरोना संक्रमणापासून कशा पद्धतीनं कोरोना रुग्णवाढ नोंदवण्यात आली होती, त्यावरही एक नजर टाकुयात..

  1. 7-8-2020- 20 लाख
  2. 20-8-2020- 30 लाख
  3. 5-9-2020- 40 लाख
  4. 16-9-2020 – 50 लाख
  5. 28-9-2020- 60 लाख
  6. 11-10-2020- 70 लाख
  7. 29-10-2020- 80 लाख
  8. 20-11-2020- 90 लाख
  9. 19-12-2020- 1 कोटी
  10. 4-5-2021- 2 कोटी
  11. 23-6-2021- 3 कोटी
  12. 26-1-2021- 4 कोटी

संबंधित बातम्या :

Corona Vaccine : मोठी खूशखबर! कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सिन लसीचा डोस 225 रुपयांनी स्वस्त

प्रीकॉशनरी डोससंदर्भात मोठी बातमी! 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना घेता येणार डोस, पण…

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.