लॉरेन्स बिश्नोई भारतातील ‘सेकंड दाऊद’?; 700 शूटर, इतक्या देशात मोठे नेटवर्क, NIA च्या दोषारोपपत्रात कारनाम्यांची जंत्रीच
Lawrence Bishnoi and Goldie Brar : NIA ने कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बरार यांच्यासह अनेकांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये एनआयएने मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार बिश्नोई आता भारताचा सेकंड दाऊद तर ठरत नाही ना, असा दावा करण्यात येत आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बरार गँगसह इतर अनेक कुख्यात गुन्हेगारांची कुंडलीच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) केली आहे. या सर्व गँगस्टरच्या मागावर तपास यंत्रणा आहेत. त्यांचे शूटर कोण, त्यांचा माग घेण्यात येत आहे. या सर्व कुख्यात गुन्हेगारांविरोधात एनआयएने दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात त्यांच्या कारनाम्यांची जंत्रीच समोर आली आहे. त्यानुसार या गँगकडे आजघडीला 700 हून अधिक शूटर आहे. तर इतक्या देशात त्यांचे मोठे नेटवर्क आहे.
लॉरेन्स बिश्नोई दुसरा दाऊद?
NIA ने या कुख्यात गुंडांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात त्याचे टेरर सिंडिकेट समोर आणले आहे. त्यानुसार बिश्नोई गँगचे नेटवर्क फार मोठे आहे. 1990 मध्ये दाऊद इब्राहिमने छोटे-मोठे गुन्हे करत आपले नेटवर्क मोठे केले होते. दाऊद इब्राहिम याने अंमली पदार्थांची तस्करी, टार्गेट किलिंग, खंडणी यामाध्यमातून त्याचे साम्राज्य उभं केलं होते. त्याने त्याची D कंपनी तयार केली होती. त्यानंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी त्याने हात मिळवला. त्याचे नेटवर्क अजून वाढवले. आज आखाती देशापासून ते पूर्वोत्तर अनेक देशात त्याचे मोठे नेटवर्क आहे. त्याने स्वतःचे मोठे नेटवर्क आहे. सध्या उत्तर भारतात बिश्नोई गँगची दहशत आहे. त्यांचे मोठे नेटवर्क आहे.
लॉरेन्स बिश्नोईकडे 700 पेक्षा जास्त शूटर
कॅनाडा पोलीस आणि भारतीय तपास यंत्रणांना हवा असलेला सतविंदर सिंह उर्फ गोल्डी बरार हा सध्या बिश्नोई गँग चालवत आहे. NIA च्या माहितीनुसार, बिश्नोई गँगमध्ये 700 पेक्षा अधिक शूटर आहेत. त्यात सर्वाधिक 300 शूटर हे पंजाबमधील आहेत. विशेष म्हणजे समाज माध्यमांच्या माध्यमातून फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबच्या माध्यमातून बिश्नोई आणि गोल्डी बरार यांचा प्रचार करण्यात येतो. बिश्नोई गैंगने वर्ष 2020-21 पर्यंत खंडणीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावले आहे. तो पैसा हवालाच्या माध्यमातून परदेशात पाठवण्यात आला आहे.
भारतातील 11 राज्य आणि 6 देशात गुन्हेगारी साम्राज्य
एनआयएच्या दाव्यानुसार, बिश्नोई गँग पूर्वी पंजाबपूरतीच मर्यादीत होती. पण नंतर या गँगचा मोठा विस्तार झाला. स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने मोठे नेटवर्क तयार झाले. लॉरेन्सने गोल्डी बरार याच्या मदतीने हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमधील इतर गुन्हेगारांशी संबंध वाढवले. आता त्यांचे नेटवर्क पूर्वोत्तर राज्यापर्यंत पोहचले आहे. यामध्ये देशातील 11 जिल्ह्यांचा तर परदेशातील सहा देशांचा समावेश आहे. त्यात USA, अजरबेजान, पुर्तगाल, UAE आणि रशियाचा समावेश आहे.