Ajit Doval : अजित डोवाल यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा, 3 कमांडो बडतर्फ, पोलीस महासंचालक आणि कमांडेंट यांच्या बदल्या, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या घरात घुसण्याचा झाला प्रयत्न
2019 मध्ये पुलवामाच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारच्या सांगण्यानुसार, अजित डोवाल यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्जिक स्ट्राईकचे प्लॅनिंग केले होते.
नवी दिल्ली – देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणाच्या प्रकरणात सीआयएसएफच्या (CISF) तीन कमांडोंना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यासह पोलीस महासंचालक आणि कमांडेट रँकच्या जोन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये ही घटना घडली होती. त्यावेळी एक संशयित कार घेऊन अजित डोवाल यांच्या दिल्लीतील (Delhi) सरकारी निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला अटक केली होती. आरोपीला पकडण्यात आल्यानंतर त्याच्या केलेल्या तपासणीत, त्या आरोपीने सांगितले होते की, त्या शरिरात काही चिप असल्याचे सांगितले होते. ज्या चिप रिमोटने चालवता येत आहेत. मात्र तपासणीत असे काहीही सापडले नाही.
Three CISF commandos have been dismissed while one DIG and a commandant rank officer of the force transferred following security breach at residence of NSA Ajit Doval in February this year: Officials
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) August 17, 2022
16 फेब्रुवारीच्या सकाळी घडला होता प्रकार
हा आरोपी 16 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी एक रेड कलरची एसयूव्ही घेऊन डोभाल यांच्या निवासस्थानी पोहचला होता. त्याने चौकशीत सांगितले की तो कर्नाटकातील रहिवासी असून भाड्याची गाडी चालवत होता. त्या आरोपीची ओळख बंगळुरुचा शंतनू रेड्डी या नावाने झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार त्याचे मानसिक स्वास्थ ठिक नसल्याचे सांगण्यात येत होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने त्याची चौकशी केली होती.
सर्वात सुरक्षित परिसरात सुरक्षेत त्रुटी
अजित डोवाल दिल्लीतील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या लुटियन्स झोनमधील 5 जनपथ या बंगल्यात राहतात. त्यांच्याआधी माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल या ठिकाणी वास्तव्यास होते. डोवाल यांच्या बंगल्याजवळच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निवासस्थान आहे. डोवाल यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेत नेहमी सीआयएसएफचे कमांडो तैनात असतात.
डोवाल यांनी केले होते सर्जिकल स्ट्राईकचे प्लॅनिंग
2019 मध्ये पुलवामाच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारच्या सांगण्यानुसार, अजित डोवाल यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्जिक स्ट्राईकचे प्लॅनिंग केले होते. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2019 रोजी इंडियन एयरफोर्सच्या फायटर प्लेन्सने एलओसी पार करुन बालाकोटमध्ये दहशतवादी तळांवर हल्ले करत त्यांना नष्ट केले होते. अजित डोभाल हे पाकिस्तानात सात वर्ष गुप्तहेर म्हणून कार्यरत होते, ही त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होण्यापूर्वीची ओळख आहे. त्याचबरोबर ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि ब्ल्यू थंडर यातही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.