Laxmi Ratan Shukla | ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का, लक्ष्मी रतन शुक्ला यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला(Laxmi Ratan Shukla) यांनी क्रीडा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींना (Mamata banarjee) आणखी एक धक्का बसला आहे. माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला(Laxmi Ratan Shukla) यांनी क्रीडा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. लक्ष्मी रतन शुक्लांनी दिलेला राजीनामा ममता बॅनर्जींनी स्वीकारला आहे. ममता बॅनर्जींच्या पक्षाचे नेते एका पाठोपाठ राजीनामे देत आहेत. लक्ष्मी रतन शुक्लांनी हावडा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय मात्र, आमदार पदाचा राजीनामा दिलेला नाही. पश्चिम बंगालच्या मंत्रीमंडळाची बैठक आज होणार आहे. मात्र, राजीनामा दिल्याने लक्ष्मी रतन शुक्ला मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. ( Ex Cricketer Laxmi Ratan Shukla resign from post of state sport minister)
पश्चिम बंगालमध्ये येत्या काही महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ममत बॅनर्जींना वारंवार धक्के बसत आहेत. शुंभेदू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.या शिवाय तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते, आमदार भाजपमध्ये गेले आहेत. ममतांचे एकेकाळचे सहकारी आता त्यांच्यावर टीका करत आहेत.
लक्ष्मी रतन शुक्लांची कारकीर्द
West Bengal Minister-of-State, Department of Youth Services and Sports Laxmi Ratan Shukla resigns from his post.
— ANI (@ANI) January 5, 2021
लक्ष्मी रतन शुक्लांनी भारतीय संघातून तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर, आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेविल्स आणि सनराईजर्स हैदराबाद या संघात शुक्ला खेळले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी शुक्लांनी राजकारणात प्रवश केला. बंगालच्या उत्तर हावडा विधानसभा मतदारसंघातून शुक्लां विजयी झाले होते. ममता बॅनर्जींनी लक्ष्मी रतन शुक्ला यांना क्रीडा राज्यमंत्री पद सोपवले होते. लक्ष्मी रतन शुक्ला ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील तरुण मंत्री होते.
ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लक्ष्मी रतन शुक्ला यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही राजीनामा देऊ शकतं, शुक्लांनी राजीनामा पत्रात क्रिकेट आणि इतर क्रीडा प्रकारांना जादा वेळ द्यायचाय त्यामुळे राजीनामा देत असल्याचं म्हटलंय. ते आमदार म्हणून कार्यरत राहतील. कोणीही शुक्लांच्या राजीनाम्याकडे नकारात्मक दृष्टीनं पाहू नये, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.
Anyone can resign. He (Laxmi Ratan Shukla) wrote in his resignation letter that he wants to give more time to sports and will continue as an MLA. Don’t take it in a negative way: West Bengal CM Mamata Banerjee https://t.co/ivR97RIoTw pic.twitter.com/xL0hztp5KX
— ANI (@ANI) January 5, 2021
अरुप विश्वास यांच्यासोबत वाद
हावडा जिल्ह्यात लक्ष्मी रतन शुक्ला आणि मंत्री अरुप विश्वास यांच्या मध्ये वाद निर्माण झाला होता. यापूर्वी देखील शुक्लांनी तृणमूल काँग्रेसविषयी नाराजी व्यक्त केली होती. हावडा जिल्ह्यातील दुसरे मंत्री राजीव बॅनर्जी यांनी देखील पक्षात बंड केले होते. त्यानंतर पक्षाकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
ममता बनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री अरुप विश्वास यांनी लक्ष्मी रतन शुक्लांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षातून कोणी जात असेल तर कोणीतरी पक्षात येईल, असं अरुप वि्श्वास म्हणाले. तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी शुक्ला याचा राजीनामा धक्कादायक असल्याचं म्हटलं. मात्र, शुक्ला पक्ष सोडणार नाही, असा विश्वास सौगत रॉय यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपने देखील शुक्लाच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही प्रतिष्ठित व्यक्ती तृणमूल काँग्रेसमध्ये थांबणार नाही, असं भाजप उपाध्यक्ष जयप्रकाश मुजुमदार यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या:
गुजरातमध्ये ठरणार ‘बंगाल स्वारी’चं मॉडल; भाजप-संघाची आजपासून तीन दिवस बैठक
‘…तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन’, भर सभेत प्ले कार्ड्स दाखवल्यामुळे ममता बॅनर्जी भावूक
( Ex Cricketer Laxmi Ratan Shukla resign from post of state sport minister)