Malayalam actor Innocent Dies | ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार इनोसेंट यांचं निधन

सिनेसृष्टी आणि राजकीय वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. जवळपास 700 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये अभिनय साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्यांचं आणि मोदी लाटेत जिंकून आलेल्या माजी खासदारचं निधन झालं आहे.

Malayalam actor Innocent Dies | ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार इनोसेंट यांचं निधन
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 2:40 AM

तिरुवनंतपुरम | या क्षणाची सर्वात मोठी आणि तितकीच वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मळ्यालम अभिनेते आणि माजी खासदार इनोसेंट यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. इनोसेंट यांनी वयाच्या 75 वर्षी अखेरचा श्वास घेतला. इनोसेंट यांची एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत माळवली. रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, इनोसेंट यांना कोरोना, श्वसनाचा आजार, अवयव निकामी झाल्याने हृद्याचा झटका आला आणि त्यामुळे त्याचं निधन झालं. इनोसेंट यांच्या निधनाने राजकीय विश्वावर आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

इनोसेंट यांची गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकृती स्थिर नव्हती. इनोसेंट यांना आधी कॅन्सर झाला होता. मात्र त्यांनी कॅन्सर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र श्वसनासंदर्भात त्रास होत असत्याने त्यांना 3 मार्च रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची मृत्यूसोबतची अनेक दिवसांची झुंज अपयशी ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, इनोसेंट यांनी 26 मार्च रोजी रात्री 10.30 च्या दरम्यान जगाचा निरोप घेतला. इनोसेंट यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा सॉनेट असा परिवार आहे.

बहुआयामी व्यक्तित्व

इनोसेंट यांनी पृथ्वीराज सुकुमारन यांच्या 2022 मध्ये आलेल्या कडुवा सिनेमात अभिनय केला होता. इनोसेंट यांचा हा अखेरचा सिनेमा ठरला. इनोसेंट यांनी आपल्या 5 दशकांच्या कारकीर्दीत 700 पेक्षा अधिक सिनेमातून अभिनय साकारला. तसचे 12 वर्ष त्यांनी यशस्वीपणे मळ्यालम सिनेमा कलाकार संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. इनोसेंट यांनी मळ्यालम सिनेसृष्टीत कॉमेडियन म्हणूनही यश मिळवलं. याशिवाय त्यांनी खलनायकाची भूमिकाही केली. तसेच मिमिक्री आर्टिस्ट म्हणूनही इनोसेंट यांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं.

मोदी लाटेतही खासदार म्हणून विजयी

देशात 2014 मध्ये मोदी लाट होती. या लाटेत भलेभले दिग्गज आणि माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र इनोसेंट हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. इनोसेंट यांच्या प्रसिद्धचा राजकीय फायदा घेण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने इनोसेंट यांना अपक्ष म्हणून चालुकडी लोकसभा मतदारसंघातून 2014 मध्ये उमेदवारी दिली. त्यांनी काँग्रेस उमेदवार पी सी चाको यांचा पराभव करत मोदी लाटेतही बाजी मारली.

इनोसेंट यांनी पुन्हा 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसचे बेनी बेहानन यांनी इनोसेंट यांचा पराभव केला होता. दरम्यान इनोसेंट यांच्या निधनाने सिनेसृष्टीचं कधीही न भरुन निघणारं नुकसान झालं आहे. तसेच आपल्यातून एक हरहुन्नरी आणि बहुआयामी व्यक्तिमत्व निघून गेल्याची खंत सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.