सीमेवर 250-300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, भारतीय जवान डाव उधळणार : आर्मी कोअर कमांडर

भारताच्या सीमेवर 250-300 पेक्षा अधिक दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय सैन्याने दिली आहे.

सीमेवर 250-300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, भारतीय जवान डाव उधळणार : आर्मी कोअर कमांडर
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 5:15 PM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरला (Jammu-Kashmir) विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 (Article 370) हटवल्यानंतर तेथील परिस्थितीत हळूहळू बदल होताना दिसत आहे. जम्मू काश्मिरमधील नागरिक देखील इतर कोणत्याही राज्यातील राज्याप्रमाणेच सभ्यपणे आणि गुणतवत्तापूर्ण जीवन जगू इच्छिता, असं मत भारतीय सैन्याचे (Indian Army) लेफ्टनंट जनरल बीएस राजू (Lieutenant General BS Raju) यांनी व्यक्त केलं. जनरल बीएस राजू नियंत्रण सीमारेषेवर कट्टरवादाला रोखण्यासाठी गठीत केलेल्या चिनार कोअरमध्ये तैनात आहेत. त्यांनी पंचायत आणि जिल्हा विकास समितीच्या निवडणुकीपूर्वी पत्रकारांशी चर्चा केली (Lieutenant General BS Raju comment on Militants waiting for infiltrate).

बीएस राजू म्हणाले, “250-300 पेक्षा अधिक दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही दिवसांमध्येच थंडी सुरु होईल. मात्र, आपले जवान या कडाक्याच्या थंडीतही देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी तयार असल्याचं सांगताना मला आनंद होत आहे. आम्ही दहशतवाद्यांना कोणत्याही प्रकारची घुसखोरी करु देणार नाही.”

‘शस्त्रं उचलणाऱ्यांवर कारवाई करणार’

“जो शस्त्रं उचलेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हा संदेश आधीही काश्मिरमधील जनतेला दिलेला आहे. तसेच दिशाभूल होऊन शस्त्रास्त्र उचलणाऱ्या कुणालाही परत यायचं असेल तर त्याचाही आम्ही स्वीकार करु. अशाप्रकारे 2-3 लोकांनी आत्मसमर्पणही केलं आहे,” अशी माहिती राजू यांनी दिली.

बीएस राजू म्हणाले, “सीमेवर पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी दररोज रोखली जात आहे. सातत्याने दहशतवाद्यांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यानंतरही दहशतवादी त्यांच्या कुरापती करतच आहेत.”

‘हिंसेला नियंत्रणात आणण्यात सैन्याला यश’

जम्मू काश्मीरमधील हिंसेला रोखण्यात एका सीमेपर्यंत सैन्याला यश आलं आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आपलं दैनंदिन काम करता येणार आहे, बीएस राजू यांनी सांगितलं.

राजू म्हणाले, “कलम 370 हटवल्यानंतर येथे लॉकडाऊन लागू करण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला. यानंतर ऑल पार्टीज हुर्रियत कान्फरन्स आणि इतर विभाजनवादी संघटनांनी बंदची घोषणा केली. काही प्रमाणात या ठिकाणी आदेशांचं उल्लंघन झालं. मात्र, डिसेंबरपर्यंत स्थिती सामान्य होत गेली आणि आता दुकानं खुली आहेत आणि पर्यटनही वाढलं आहे.”

हेही वाचा :

गुपकार घोषणा: “आम्ही भाजपविरोधी आहोत, देशविरोधी नाही”, पीपल्स अलायन्सच्या बैठकीत फारुक अब्दुल्ला गरजले

जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही, मेहबुबा मुफ्तींचे वक्तव्य, भाजपची अटकेची मागणी

Jammu and Kashmir : कुलगाम भागात भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Lieutenant General BS Raju comment on Militants waiting for infiltrate in Jammu Kashmir

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.