उत्तर प्रदेशमधील ओबीसी आरक्षणाला न्यायालयाची स्थगिती, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशप्रमाणे उत्तरप्रदेश सरकारला काय करावे लागणार?

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारची अडचण झाली असून उत्तरप्रदेश येथील स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे. आरक्षण मिळवण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारप्रमाणे कार्यवाही करावी लागेल.

उत्तर प्रदेशमधील ओबीसी आरक्षणाला न्यायालयाची स्थगिती, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशप्रमाणे उत्तरप्रदेश सरकारला काय करावे लागणार?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 3:22 PM

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात उत्तरप्रदेश सरकारला सुद्धा न्यायालयाने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश प्रमाणे झटका दिला आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश या राज्यांनी ओबीसी आरक्षणाची ट्रीपल टेस्ट पूर्ण केल्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारला देखील ओबीसी आरक्षणासाठी ट्रीपल टेस्ट करण्याचे आदेश लखनऊ उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. ओबीसी आरक्षणाला आता महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश प्रमाणे उत्तरप्रदेशमध्येही स्थगिती देण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणासाठी ट्रीपल टेस्ट करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तो पर्यंत उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणूका आता ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत.

लखनऊ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ति देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ति सौरभ लवानिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर देखील न्यायालयाने असाच आदेश दिला होता, त्यामुळे महाराष्ट्रात मोठं राजकीय वातावरण तापलेलं होतं.

महाराष्ट्र सरकारने ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्रात आता ओबीसी आरक्षण लागू झालं आहे. तरीही काही याचिकेवर सुनावणी अद्यापही प्रलंबित आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील 92 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्यापही कायम आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात गेला होता,त्यावेळी ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने महाविकास आघाडीसरकारच्या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली होती.

उत्तर प्रदेशातील निवडणुका आता ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्या तरी पुढील निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार घ्यावयाची असेल तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशप्रमाणे ट्रिपल टेस्ट पूर्ण करावी लागणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.