नक्षलवाद्यांशी संबंध, जन्मठेपीची शिक्षा आता निर्दोष; कोण आहेत प्रो. साईबाबा?

जीएन साईबाबा यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्त केले आहे. गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्यासह सहा जणांना जन्मठेप सुनावली होती. त्यांच्यासह पाच जणांची आज निर्दोष सुटका झाल्याने सरकार आणि पोलीसांना मोठा हादरा बसला आहे. कोण आहेत हे जीएन साईबाबा....

नक्षलवाद्यांशी संबंध, जन्मठेपीची शिक्षा आता निर्दोष; कोण आहेत प्रो. साईबाबा?
GN SaibabaImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 1:36 PM

नागपूर | 5 मार्च 2024 : मावोवादी नक्षलींशी संबंधी ठेवल्याच्या आरोपातून गडचिरोली सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावलेल्या दिल्ली विद्यापीठाचे जी.एन.साईबाबा यांच्या सह पाच जणांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष सुटका केली आहे. जी.एन.साईबाबा आणि इतरांना गडचिरोली सत्र न्यायालयाने मार्च 2017 मध्ये कथित मावोवादी संबंध आणि देशाविरोधात युद्ध छेडल्याच्या गंभीर आरोपाप्रकरणी दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हायकोर्टाच्या या निर्णयाने पोलिस यंत्रणा आणि राज्य सरकारला धक्का बसला आहे. माजी प्रोफेसर असलेले जी.एन.साईबाबा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर प्रोफेसर पदावरुन निलंबित केले होते.

कोण आहेत प्रोफेसर साईबाबा

जीएन साईबाबा हे दिल्ली युनिव्हर्सिटीच्या रामलाल आनंद कॉलेजात इंग्रजी शिकवायचे. साल 2003 मध्ये ते प्रोफेसर झाले. ती इंग्रजी विभागाचे सहायक प्रोफेसर होते. त्यांना महाराष्ट्राच्या गडचिरोली पोलिसांनी अटक केल्यानंतर साल 2014 रोजी निलंबित केले गेले. त्यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना अर्धा पगार मिळत होता. त्यानंतर 31 मार्च 2021 मध्ये कॉलेजच्या प्रिन्सिपलने त्याची तत्काल प्रभावाने त्यांची सेवा समाप्त केली होती. मार्च 2017 मध्ये गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना एक पत्रकार आणि जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी सह अन्य लोकांना कथित माओवाद्यांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरुन दोषी ठरवित शिक्षा सुनावली होती.

काय आहे प्रकरण

जी.एन.साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना साल 2014 मध्ये मावोवादी गटाशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली होती. साईबाबा, महेश तिर्की, हेम मिश्रा, नारायण सांगलीकर आणि प्रशांत राही यांनी अपिल दाखल केले होते. विजय तिर्की यांना 2017 मध्ये विशेष न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. विजय तिर्की यांना जामिन मिळाला होता. तर पांडू नरोटे यांचा गेल्यावर्षी स्वाईन फ्लूने तुरुंगातच मृत्यू झाला. व्हीलचेअर वापरतात …

पोलीओने दोन्ही पाय अधू

प्रोफेसर जी.एन.साईबाबा यांना 9 मे 2014 रोजी महाराष्ट्र पोलिसांनी दिल्लीतील त्यांच्या घरातून अटक केली होती. ते बंदी घातलेली संघटना भाकप ( मावोवादी ) चे सदस्य असल्याचा पोलिसांचा आरोप होता. जेव्हा जवाहरलाल युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी हेमंत मिश्रा याला मावोवादी संघटनेशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी अटक केली त्याने तपासात साईबाबा यांचे नाव सांगितल्याने त्यांना अटक झाली. आता त्यांना निर्दोष सुटका झाल्याने दिलासा मिळाला आहे. जीएन साईबाबा यांचे पूर्ण नाव गोकरकोंडा नागा साईबाबा असे आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी येथे झाला. पोलिओ विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर पाच वर्षांचे असताना त्यांचे पाय अधू झाले तेव्हापासून ते व्हीलचेअर वापरतात. ते शारीरिकदृष्ट्या 90 टक्के अपंग आहेत.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....