अगं आई गंsss…! सर्पदंशानं गंगेचा जीव घेतला, इस्राईलमधून आणलेल्या गंगा सिंहीणीच्या मृत्यूनं हळहळ
गंगा ही एक आफ्रिकन सिंहीण आहे. एका विषारी सापानं तिला दंश केला होता. शनिवारी सकाळी झालेल्या सर्पदंशानंतर तिच्या शरीरात विष वेगानं पसरलं आणि तिने प्राण सोडला.
ओडिशा : सर्पदंशानं (Snake bite on lioness) गंगेचा जीव घेतलाय. गंगा ही एक सिंहीण असून तिला इस्राईलमधून आणण्यात आलं होतं. ओडिशाची नंदकानन प्राणीसंग्रहालात (Nandakanan Zoo) ही सिंहीण राहत होती. शनिवारी तिच्या मृत्यूचू दुःखद बातमी समोर आली. सर्पदंशानं तिचा मृत्यू झाला. तिला वाचवण्याचे प्रयत्नही करण्यात आले. शर्थीच्या प्रयत्नानंतरही तिला वाचवण्यात यश आलं नाही. आता या सिंहीणीच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतिक्षा आहे. दरम्यान, या सिंहीणीच्या मृत्यूनं प्राणीप्रेम हळहळेत. गंगा सिंहीणींचं वय 15 वर्ष होतं. तिला इस्राईलमधून आणण्यात आलं होतं. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंगा सिंहीणीला सर्पदंश झाल्याचं कळताच त्यांनी तत्काळ तिच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली होती. पण तिला वाचवण्यात यश येऊ शकलं नाही.
विष वेगानं पसरलं आणि….
ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये असलेल्या नंदकानन प्राणीसंग्रहालयात 2015 साली या सिंहीणीला आणण्यात आलं होतं. गंगा ही एक आफ्रिकन सिंहीण आहे. एका विषारी सापानं तिला दंश केला होता. शनिवारी सकाळी झालेल्या सर्पदंशानंतर तिच्या शरीरात विष वेगानं पसरलं आणि तिने प्राण सोडला.
Odisha | 15 yr-old African lioness named ‘Ganga’ brought from Israel in 2015 died today morning due to a suspected Snakebite in Nandankanan zoo. Veterinary doctors tried to treat her but she could not be saved. Postmortem report awaited:Dy Director, Nandankanan zoo, Bhubaneswar pic.twitter.com/lhDnbnCMDQ
— ANI (@ANI) May 28, 2022
2 महिन्यांपूर्वी आनंद.. 2 महिन्यांनंतर दुःख
मार्च महिन्यातच नंदकाननन प्राणीसंग्रहालयात एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं होतं. या प्राणीसंग्रहालायतील बिजली नावाच्या वाघिणीनं एका बछड्याला जन्म दिला होता. 110 दिवस गरोदर राहिल्यानंतर एका बछड्याला जन्म दिला होता. त्यानंतर या बछड्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून निरीक्षणाखाली ठेवलं होतं. दरम्यान, दोन महिन्यानंतरच गंगा सिंहीणीच्या मृत्यूने प्राणी प्रेमींनी मोठा धक्का बसलाय.
पाहा महत्त्वाची राजकीय बातमी
दरम्यान, सर्पदंश करणारा विषारी सापही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गंगा सिंहीणीच्या मृत्यूनंतर आता तिचं पोस्टमॉर्टेमही केलं जाणार आहे. त्यानंतर तिच्या मृत्यूचं कारण अधिक स्पष्ट होईल. यानंतर या सिंहीणीच्या मृत्यूचं मूळ कारण स्पष्ट होईल.