Supreme Court : सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण, जाणून घ्या प्रक्रिया
देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एनव्ही रमण हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी थेट प्रक्षेपण प्रणालीचे उद्घाटन होईल, अशी अपेक्षा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाची लाईव्ह सुनावणी कोणत्याही चॅनलद्वारे उपलब्ध नसून, सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल.
मुंबई – पुढील महिना सर्वोच्च न्यायालयासाठी (Supreme Court) ऐतिहासिक ठरू शकतो. कारण देशातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण (Live broadcast) ऑगस्टपासून (August) सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुद्धा तयारी जोरात सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम तीन वरिष्ठ न्यायालयांमध्ये म्हणजेच न्यायालय क्रमांक एक, दोन आणि तीनमध्ये होणाऱ्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण सुरू केले जाईल. नंतर ते इतर न्यायालयामध्ये सुरळीत करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे न्यायालयातील कामकाज लवकरचं ऑनलाईन पाहायला मिळेल.
सर्वोच्च न्यायालयात असलेल्या घुमटाच्या खालच्या बाजूला एक न्यायालय
सर्वोच्च न्यायालयात असलेल्या घुमटाच्या अगदी खालच्या बाजूला असलेल्या स्थित क्रमांक एक न्यायालय हे मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाचे न्यायालय आहे. न्यायालय क्रमांक दोनमध्ये, ज्येष्ठतेच्या क्रमाने, सरन्यायाधीशांच्या शेजारी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ बसते. त्याचप्रमाणे पदानुसार न्यायाधीश ज्येष्ठतेच्या क्रमाने खंडपीठाचे नेतृत्व करतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल
देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एनव्ही रमण हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी थेट प्रक्षेपण प्रणालीचे उद्घाटन होईल, अशी अपेक्षा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाची लाईव्ह सुनावणी कोणत्याही चॅनलद्वारे उपलब्ध नसून, सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. हे व्यासपीठ राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र सरकारी एजन्सीद्वारे चालवले जाईल. त्याची लिंक कोर्ट शेअर करेल. प्रत्यक्ष सुनावणीपासून काही सेकंदांच्या विलंबानंतर संबंधित कंटेट वेब पोर्टलवर उपलब्ध होईल. म्हणजेच हे प्रक्षेपण काही सेकंदांनी वेबसाइटवर येईल. जेणेकरून सुनावणीदरम्यान काही आक्षेपार्ह, अयोग्य किंवा अनावश्यक टिप्पणी किंवा युक्तिवाद असेल तर ते वेबकास्टवर जाण्यापूर्वी काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.