दिल्लीच्या कन्टेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन?, केजरीवालांचा केंद्र सरकारला प्रस्ताव

राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे.

दिल्लीच्या कन्टेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन?, केजरीवालांचा केंद्र सरकारला प्रस्ताव
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 2:08 PM

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. दिल्ली सरकारने काही प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. दिल्लीतील गर्दीची ठिकाणे अनिश्चित काळासाठी बंद करण्याची परवानगी दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडे मागितली आहे तसंच दिल्लीतील कन्टेन्मेंट झोनमध्ये पुन्हा टाळेबंदी करण्याच्या विचारात केजरीवाल सरकार आहे. (Lockdown again in Delhi containment zone? Arvind Kejriwal proposal to the central government)

वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे राज्य सरकार चिंतेत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जी पावले उचलायला हवीत, आम्ही ती उचलतो आहोत, असं सांगत कोरोनासंबंधीचे नियम अधिक कडक करण्याचे संकेत केजरीवाल यांनी दिले. तसंच लग्नसोहळ्यासाठी 200 जणांना उपस्थिती लावण्याची परवानगी दिल्ली सरकारने दिली होती, ती देखील आता माघारी घेण्यात आली आहे.

सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्सची संख्या पुरेसी आहे. परंतु आयसीयूमध्ये बेडची कमतरता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने मदत केली आह, असंही केजरीवाल यांनी सांगितलं. “केंद्र आणि राज्य सरकार एकत्र मिळून काम करत आहे परंतु सर्वात मोठी गरज आहे ती म्हणजे लोकांनी काळजी घेतली पाहिजे. बरेच लोक मास्कशिवाय फिरत आहेत. माझं त्यांना आवाहन आहे की कृपया मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा”, असं केजरीवाल म्हणाले.

दिल्लीत सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रापेक्षा अधिक कोरोनाचा कहर आहे. गेल्या 24 तासांत 99 रुग्णांचा कोरोनाने जीव गेला आहे. प्रत्येक तासाला चार नागरिकांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. गेल्या 17 दिवसांमध्ये दिल्लीत 1100 पेक्षा अधिक नागरिकांचा कोरोनाने जीव घेतला आहे.

दिल्लीत कोरोनाचं संक्रमन कसं वाढलं?

दिल्लीत कोरोना संक्रमनाचा वेग मंदावला होता. मात्र, गेल्या दोन आठवड्यात संक्रमनाचा वेग वाढला. दिल्लीत 28 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा 5 हजार 673 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर 2 नोव्हेंबर वगळता दररोज पाच हजार पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळत आहेत.

दिल्लीत कोरोना संक्रमन वाढण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. सणांनिमित्ताने लोक एकमेकांच्या जास्त संपर्कात आले. याशिवाय दिल्लीत प्रदूषणदेखील वाढलं आहे. त्याचबरोबर थंडीदेखील वाढली आहे. या कारणांमुळे दिल्लीत कोरोना रुग्ण वाढले आहेत.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांनी मास्क वापरावं, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं, असा सल्ला तज्ज्ञांनी दिल्लीच्या नागरिकांना दिला आहे.

(Lockdown again in Delhi containment zone? Arvind Kejriwal proposal to the central government)

संबंधित बातम्या

दिल्लीची कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच, वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल सरसावले

पुढच्या 10 दिवसांत दिल्लीतील कोरोना नियंत्रणात येण्याची अपेक्षा : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

Corona | नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरा, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.