Lockdown : देशात अन्नाचा पुरेसा साठा, 6 महिने घरी बसून खाण्याइतकं धान्य उपलब्ध
लॉकडाउन दरम्यान (Lockdown in India) देशात गहु आणि तांदुळ यांसारख्या धान्याची काहीही कमतरता नाही.
नवी दिल्ली : लॉकडाउन दरम्यान (Lockdown In India) देशात गहु आणि तांदुळ यांसारख्या धान्याची काहीही कमतरता नाही. भारतीय खाद्य महामंडळाकडे(Food Corporation Of India) 6 महिन्यांच्या खाद्यपदार्थांचा साठा आहे. जो देशासाठी पुरेसा आहे आणि पुरवठ्यात कोणताही (Lockdown In India) व्यत्यय येणार नाही.
अन्नदाताः COVID-19 के दौरान @FCI_India रेलवे ? के माध्यम से खाद्यान्न आपूर्ति को सुनिश्चित कर रहा है।
रेलवे के 352 रैक से 9.86 लाख मीट्रिक टन खाद्यान्न देश के विभिन्न हिस्सों में भेजा गया है। सरकार के इस कदम से किसानों को भी उनकी आय में सहायता मिलेगी।https://t.co/Kumr9kkY0m pic.twitter.com/rhKN9MLtmJ
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 2, 2020
खाद्य अधिकारी डॉ. सतिश यांच्यानुसार, भारतीय खाद्य महामंडळाचे लाखो मजूर आणि कर्मचारी देशाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत धान्य पोहोचावे यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. भारतीय खाद्य महामंडळ दररोज देशाच्या वेगवेगळ्या भागात धान्य पोहोचवण्याचं काम करत आहे.
अन्न मंत्रालयानुसार (Food Ministry),भारतीय खाद्य महामंडळ (एफसीआय) ही देशातील धान्य साठवण्याची सर्वात महत्वाची सरकारी संस्था असून, 31 मार्चला एफसीआयकडे 5.67 कोटी मेट्रिक टन धान्यसाठा होता. यामध्ये 3 कोटी मेट्रिक टन तांदुळ तर 2.60 कोटी मेट्रिक टन गहू आहे. (Lockdown In India) एफसीआयने मोफत अन्न पुरवठा करण्याचीही तयारी केली आहे.
Working in full swing in this time of need, the FCI has already supplied over 10 LMTs of food grains across the country since 24th March, with the help of 352 rail racks.
The agency is fully prepared to meet the additional requirements during the lockdown. pic.twitter.com/6FMO96ke6B
— BJP (@BJP4India) April 2, 2020
अन्नमंत्री रामविलास पासवान (Food Minister Ram Vilas Paswan) यांनी देशातील नागरिकांना आश्वासन देत ट्विट केलं. “एफसीआयजवळ अन्न-धान्याचा पुरेसा साठा आहे. एप्रिलच्या पहिल्या तारखेला रेल्वेच्या 53 रेकवर 1.48 लाख मेट्रिक टन धान्य वेगवेगळ्या राज्यात पाठवण्यात आलं आहे. याप्रमाणे 24 मार्च म्हणजेच लॉकडाऊन लागू झाल्यापासून ते आतापर्यंत मालगाडीच्या 352 रेकच्या माध्यमातून जवळपास 9.86 लाख मेट्रिक टन धान्य वेगवेगळ्या राज्यात पाठवण्यात आलं आहे”, अशी माहिती रामविलास पासवान यांनी ट्विटमध्ये दिली.
एफसीआयने ओपन मार्केट सेल्स स्कीम अंतर्गत ई-लिलावाद्वारे सर्व राज्य सरकारांना, तसेच मान्यता प्राप्त गहू गिरणींना गहू उपलब्ध करुन देत आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा अधिकाऱ्यांना गरजेनुसार सर्व गहू गिरण्यांना आवश्यकतेनुसार गहू उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे. आतापर्यंत 79027 मेट्रिक चन गव्हाचा पुरवठा करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत तांदुळ खरेदीचाही प्रस्ताव (Lockdown in India) मांडण्यात आला आहे.