आझमगढमध्ये सपा नेते अखिलेश यादव यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी, गर्दी इतकी वाढली की पोलिसांनी केला लाठीमार

उत्तर प्रदेशात यंदा लोकसभेसाठी कॉंग्रेसच्या इंडिया आघाडीशी समाजवादी पार्टीची युती आहे. यंदा समाजवादी पार्टी सर्वाधिक जागा लढवित आहे. कॉंग्रस फार कमी जागा लढवित आहेत, समाजवादी पार्टीच्या रॅलीना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

आझमगढमध्ये सपा नेते अखिलेश यादव यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी, गर्दी इतकी वाढली की पोलिसांनी केला लाठीमार
SP leader Akhilesh Yadav
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 4:44 PM

18 व्या लोकसभा निवडणूकांसाठी देशभरात मतदान सुरु आहे. मतदानाचे पाच टप्पे सुरळीत पार पडले आहेत. आता मतदानाचे केवळ दोन टप्पे उरले आहेत. या टप्प्यात आता शेवटचा टप्पा येत्या 1 जून रोजी पार पडणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी निवडणूकांचा निकाल लागणार आहे. यातच उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्या रॅलीत मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. त्यामुळे प्रचार रॅलीत प्रचंड रेटारेटी होत आहे. त्यामुळे फूलपुर ( Phulpur ) आणि संतकबीरनगर ( Santkabirnagar ) आणि आता आझमगड ( Azamgarh ) येथे निवडणूक प्रचार सुरु असताना अखिलेश यादव यांच्या रॅलीत गर्दी बेकाबू झाल्याने चेंगराचेंगरी झाली त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला.

लालगंज लोकसभा क्षेत्रातील समाजवादी पार्टीचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या प्रचार सभेत पुन्हा एकदा चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण झाली. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओत व्यासपीठाच्या दिशेने जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठी ढकलण्यासाठी पोलिसांनी बलाचा वापर केला तेव्हा कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर चढून पळून जाऊ लागले. या दरम्यान स्टेजजवळ लावलेले लाऊड स्पीकर देखील कोसळले. त्यानंतर कार्यकर्त्यांना जेव्हा मागे ढकलेले तेव्हा पाठच्या कार्यकर्त्यांनी तेथून पसार होणे पसंत केले.

येथे पाहा एक्स पोस्ट –

याआधी प्रयागराज येथील फूलपूर येथे कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची संयुक्त सभा झाली. त्यावेळी देखील असेच स्थिती होती. येथे देखील परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दोन्ही नेत्यांना तेथून पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढावे लागले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांनी संवाद साधल्याचा एक व्हिडीओ जारी केला होता.

संत कबीर नगरातील रॅलीतही गोंधळ

उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या संतकबीर नगरमध्ये मोठ्या संख्येने जमलेले सपाचे कार्यकर्ते बॅरिकेड्स तोडून व्यासपीठाकडे जात होते, त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संत कबीर नगर रॅलीच्या या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुरक्षेचा घेरा तोडून सपा नेत्यांच्या गाडीपर्यंत पोहोचले. यावेळी कार्यकर्त्यांनी अखिलेशसोबत सेल्फी देखील काढला.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.