‘कोण आहेत राहुल गांधी…पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का?’, मोदींना खुल्या चर्चेचे आमंत्रण दिल्यानंतर भाजपने केला पलटवार

BJP On Rahul Gandhi's Open Debate : अमेरिकन निवडणुकीत आणि इतर अनेक देशांच्या निवडणुकीत विरोधी आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये अनेक मुद्यांवर खुली चर्चा होते. काँग्रेस नेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेच निमंत्रण दिले. त्यावरुन आता वादाला तोंड फुटले आहे.

'कोण आहेत राहुल गांधी...पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का?', मोदींना खुल्या चर्चेचे आमंत्रण दिल्यानंतर भाजपने केला पलटवार
खुल्या चर्चेच्या निमंत्रणावरुन वाद
Follow us
| Updated on: May 12, 2024 | 3:52 PM

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मदी यांना खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले आहे. तर या चर्चेपूर्वची वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या या प्रस्तावावर भाजपने तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे. केंद्रीय मंत्री आणि अमेठी येथील भाजपचे लोकसभेचे उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे खुल्या चर्चेपूर्वीच वादाने या मुद्याचा श्रीगणेशा झाला आहे.

स्मृती इराणींची जहरी टीका

हे सुद्धा वाचा

“राहुल गांधी यांच्यात एका सामान्य भाजप कार्यकर्त्याविरोधात निवडणूक लढण्याची हिम्मत नाही. त्यामुळे त्यांनी शेखी मिरवू नये. दुसरी गोष्ट म्हणजे, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर चर्चा करण्यास येऊ इच्छितो, ती व्यक्ती INDIA आघाडीची पंतप्रधान पदाची उमेदवार आहे का?” अशी जहरी टीका स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

राहुल गांधी कोण आहेत?

भाजप नेते तेजस्वी सूर्या यांनी पण काँग्रेसवर पलटवार केला आहे. राहुल गांधी कोण आहेत, जे पंतप्रधानांशी खुली चर्चा करु इच्छितात? असा प्रश्न त्यांनी विचारला. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नाहीत. INDIA आघाडीची तर चर्चाच नको. त्यांनी अगोदर स्वतःला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावं. त्यांनी हे मान्य करावं की, त्यांच्या पक्षाच्या पराभावाला तेच जबाबदार असतील. त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांना खुल्या चर्चेचे निमंत्रण द्यावं असा टोला तेजस्वी सूर्या यांनी लगावला.

ते तर पंतप्रधानाचा चेहरा पण नाहीत

भाजप आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी पण राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्याने राहुल गांधी यांचा उत्साह वाढला आहे. खुली चर्चा चांगली आहे. पण सध्याच्या पंतप्रधानांना राहुल गांधी यांच्याशी खुली चर्चा करण्याचे कारण काय? ते तर काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत आणि INDIA आघाडीचा चेहरा पण नाहीत, अशी टीका मालवीय यांनी केली.

काय म्हणाले होते राहुल गांधी

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. चांगल्या लोकशाहीसाठी देशातील प्रमुख पक्षांनी एकाच मंचावर आपले धोरण देशासमोर मांडणे एक सकारात्मक पाऊल ठरेल. काँग्रेस या विचारांचे स्वागत करते. तसेच चर्चेचे निमंत्रण स्वीकार करते. देशाच्या पंतप्रधानांनी पण या चर्चेत सहभागी व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.