‘मुलाच्या नवसापोटी, पैदा केली नऊ-नऊ मुलं’, नितीश कुमार हे लय वंगाळ बोलून गेले

Nitish Kumar Personal Attack : लोकसभेच्या रणधुमाळीत तिखट शाब्दिक हल्ले सुरु आहेत. अनेक नेते एकमेकांवर घणाघात करत आहेत. तर काहींचा टीका करताना केव्हा तोल सुटतो, हे त्यांच्या पण लक्षात येत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा असाच तोल ढळला आहे.

'मुलाच्या नवसापोटी, पैदा केली नऊ-नऊ मुलं', नितीश कुमार हे लय वंगाळ बोलून गेले
नितीश कुमार यांची जीभ घसरली
Follow us
| Updated on: May 17, 2024 | 4:36 PM

लोकसभेची निवडणूक सुरु आहे. बिहारमध्ये पण निवडणुकीची धामधूम आहे. भाजपला झिडकारुन नितीश यांनी लालू यांच्या आरजेडीचा कंदिल पण हाती धरला. त्यानंतर INDIA आघाडीत हाती काहीच लागत नसल्याचे लक्षात येताच नितीश बाबू पुन्हा भाजपच्या गोटात दाखल झाले. आता त्यांचा निशाण्यावर अर्थातच राष्ट्रीय जनता दल, लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस आहे. आता सध्या बिहारी ढंगात एकमेकांच्या उखळ्यापाखळ्या काढल्या जात आहे. पण नितीश बाबूंचा आरोप करताना तोल ढळला आहे.

टीका करताना विसरले भान

तर शुक्रवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर हल्लाबोल केला. पण नितीश बाबू टीका करताना भान विसरले. त्यांनी थेट कुटुंबावर हल्ला केला. ” जरा सांगा तरी, कोणी इतके मुलं कुठं जन्माला घालतं का? एका मुलाच्या इच्छेने नऊ-नऊ मुलं पैदा केली. त्यांनी मला सांगितलं की, त्यांना (लालू प्रसाद यादव) मुलगा होत नव्हता, त्यामुळे त्यांनी नऊ-नऊ मुलं पैदा केली. इतकं होऊन पण त्यांना नेताजी करण्यासाठी अनेकजण रात्रंदिवस मेहनत करत आहेत.” असे नितीश कुमार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

कुटुंबासाठी सतत चिंताग्रस्त

  • लालू प्रसाद यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना नितीश कुमार यांनी टीकेची कोणतीच मर्यादा यावेळी ठेवली नाही. नितीश कुमार हे राजकीय वर्तुळात हजरजबाबी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांना नेहमी त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय जीवनाचीच चिंता असते, असा आरोप केला. आपण कधीच घराणेशाही केली नसल्याचा दावा त्यांनी केला.
  • मोतिहारी येथे जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. भाजपचे नेते पण लालू प्रसाद यादव यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत आहेत. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाजीपुरा येथील जाहीर सभेत आरजेडी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. लालू प्रसाद यादव यांना त्यांच्या मुलाच्या राजकीय करिअरची चिंता आहे, ते तुमच्या मुलांची चिंता कशाला वाहतील असा टोला मोदींनी लगावला होता.

वाराणसीमध्ये नाही गेले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे अनेक दिग्गज नेते. एनडीएमधील घटक पक्षांचे नेते, मुख्यमंत्री झाडून यावेळी उभे होते. नितीश कुमार पण जाणार होते. पण त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांनी ब्रेक घेतला. ब्रेक घेतल्यानंतर काल घेतलेल्या सभेत त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला.

Non Stop LIVE Update
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका.
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.