लोकसभेच्या मैदानात NDA ची धाव कुठपर्यंत? लालबहादूर शास्त्री यांच्या नातवाने तर खोडले सर्वच दावे

Adarsh Shastri on NDA : देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री यांनी आपला रामराम ठोकला आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांनी एका मुलाखतीत अनेक विषयांवर आणि मुद्यांवर त्यांचे बेधडक मत मांडले.

लोकसभेच्या मैदानात NDA ची धाव कुठपर्यंत? लालबहादूर शास्त्री यांच्या नातवाने तर खोडले सर्वच दावे
NDA ला मिळतील इतक्या जागा
Follow us
| Updated on: May 25, 2024 | 3:39 PM

Lok Sabha Election 2024 : ‘जय जवान-जय किसान’ हा नारा देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता. त्यांचे नातू आदर्श शास्त्री हे पण गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतीय राजकारणात नशीब आजमावत आहे. यापूर्वी त्यांनी आपमधून उमेदवारी केली. पण केजरीवाल यांच्याशी वादानंतर त्यांनी काँग्रेसचा मार्ग निवडला. त्यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयावर आणि मुद्यांवर बेधडक मतं मांडली. सध्या मोदी सरकार सत्तेत परत येईल का त्यांचा ‘अब की बार 400 पारचा’ नारा खरा होईल का? याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावर शास्त्री यांनी NDA केवळ इतक्या जागा मिळवेल, असा दावा केला आहे.

आपमध्ये लोकशाही नाही

उमेदीच्या काळात आदर्श शास्त्री हे बड्या आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत होते. त्यांनी आपच्या आंदोलन काळात राजकारणात उडी घेतली. द्वारका विधानसभा निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. पण देशात लोकशाही असावी. हुकूमशाही नसावी असा नारा देणाऱ्या आपमध्येच लोकशाही नसल्याचा अनुभव आल्याचे मत त्यांनी मांडले. आपवर चोहो बाजूने हल्ले होत असताना आदर्श शास्त्री यांनी पण पक्षावर तोफ डागली. आपला सोडचिठ्ठी दिली. ते काँग्रेसमध्ये दाखल झाले.

हे सुद्धा वाचा

कार्यकर्ते, नेत्यांची नाराजी

2014 आणि 2019 मधील निवडणुकीत आपने काँग्रेसची जागा घेतल्याचे शास्त्री म्हणाले. काँग्रेसची आपसोबतची हातमिळवणी कार्यकर्ते आणि नेत्यांना आवडली नाही. ते नाराज होते. पण पक्ष नेतृत्वासमोर भाजप आणि पीएम मोदी यांच्या विरोधाची मोठी लढाई होती. त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र भाजप, मोदींविरोधात येण्याचा निर्णय घेतला असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मग एनडीएला किती जागा मिळतील?

‘अब की बार 400 पार’ असा नारा भाजपने दिला आहे. या नाऱ्यावरुन देशभरात एकच काहूर माजले. भाजपसोबतच्या मित्रपक्षांनी पण या नाऱ्यावर नाराजी व्यक्त केली. काहींनी हा नार जनतेला रुचला नसल्याचे भाकित केले. याविषयी आदर्श शास्त्री यांनी पण त्यांचे मत व्यक्त केले. इंडिया आघाडी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विक्रमी जागांनी विजयी होईल, असा दावा त्यांनी केला. तर एनडीएला 200-220 जागांवर समाधान मानावे लागेल असे ते म्हणाले. भाजपवर लोक नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांना लोकसभेत फटका बसेल, असा सूर त्यांनी आळवला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.