कन्हैया कुमारला घातली फुलांची माळ नंतर लगावली कानशिलात, हल्लेखोराचे नाव काय
Kanhaiya Kumar Attacked : कन्हैया कुमार यांच्यावर दिल्लीत हल्ला झाला आहे. हल्लेखोरेने अगोदर त्यांना फुलांची माळ घातली आणि नंतर कानशिलात लगावली. कन्हैया उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघात काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हल्लेखोराने याविषयीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील आंदोलनानंतर कन्हैया कुमार देशभरात चर्चेत आला. डाव्या पक्षांशी काडीमोड घेत त्यानं काँग्रेसचा रस्ता धरला. आता तो उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरला आहे. या भागात प्रचारादरम्यान काल त्याच्यावर हल्ला झाला. एका युवकाने अगोदर त्याला फुलांची माळ घातली आणि नंतर त्याच्या कानशिलात लगावली. यावेळी त्याच्या अंगावर दुसऱ्या तरुणाने शाई फेकली. या तरुणांनी हे कृत्य करण्यापूर्वी आणि नंतर व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. का केली या तरुणांनी कन्हैयाला मारहाण?
दोन्ही तरुणांवर यापूर्वी पण गुन्हे
दोन तरुणांपैकी दाढी वाढवलेला तरुण फुलांची माळ गळ्यात घालण्याच्या बहाण्याने कन्हैयाजवळ जातो. माळ घातल्यानंतर तो कानशिलात लगावतो. तर दुसरा तरुण शाई फेकतो. कानशिलात लगावणारा तरुणांचे नाव दक्ष चौधरी असल्याचे समोर येत आहे. TV9 या व्हिडिओची पुष्टी करत नाही. दिल्ली पोलिसांच्या माहितीप्रमाणे, काँग्रेस पक्षाचे उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला करणारे दोन्ही तरुण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. गाझियाबाद पोलिसांनी त्यांना यापूर्वी पण अटक केली आहे.
कन्हैया कुमारवर हल्ल्यानंतर तयार केला व्हिडिओ
कन्हैया कुमारवर हल्ला करण्याच्या अगोदर आणि त्यानंतर आरोपींनी व्हिडिओ तयार केला. हल्ला करणाऱ्या तरुणांवर यापूर्वी पण धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप आहे. हल्ला करण्यापूर्वी ‘कन्हैया आता फटके खाणार’ असा व्हिडिओ आरोपींनी तयार केला होता. तर कानशिलात लगावल्यानंतर दोघांनी पु्न्हा व्हिडिओ तयार केला. “ज्या कन्हैया कुमारने भारताचे तुकडे करु हजार आणि अफजल आम्हाला लाज वाटते, तुझे मारेकरी जीवंत आहेत, अशा घोषणा दिल्या, त्याला आम्ही दोघांनी कानशिलात लावून उत्तर दिले आहे.” असे हल्लेखोर म्हणाले.
Bravo Daksh Who Slapped Traitor #KanhaiyaKumar 🦁 pic.twitter.com/LhFwT6MsV4
— Sadhvi Prachi (मोदी का परिवार) (@Sadhvi_prachi) May 17, 2024
भारताचे तुकडे कोणीच करु शकत नाही
हल्लेखोरांनी कन्हैया कुमारवर हल्ल्याचे समर्थन केले आहे. जोपर्यंत आमच्यासारखे तरुण आहेत, सनातनी जीवंत आहेत, तोपर्यंत भारताचे कोणीच तुकडे करु शकत नाही, असा दावा या व्हिडिओत या दोन तरुणांनी केला आहे. त्यांनी भारत माता की जय, भारतीय लष्कराचा विजय असो, गोमाता की जय, जय श्रीराम असा जयघोष केला.