Lok Sabha Election 2024 : अरे देवा, मतदान ओळखपत्रचं हरवलं? तरीही करता येणार मतदान

Voter ID : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा तोफा थंडावल्या आहेत. त्यानुसार उद्यापासून 19 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यात जर तुमचे निवडणूक ओळखपत्र सापडत नसेल तरी तुम्हाला मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे...

Lok Sabha Election 2024 : अरे देवा, मतदान ओळखपत्रचं हरवलं? तरीही करता येणार मतदान
मतदान ओळखपत्रं हरवलं तरी करता येणार मतदान
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 10:17 AM

लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा धुराळा बसला. आता उद्या देशभरातील काही मतदारसंघात मतदानाचा यज्ञ होईल. प्रत्येकजण उद्याच्या लोकशाही उत्सवात सहभागी होण्यासाठी उत्सूक आहे. पण काही जणांना त्यांचे मतदान कार्ड, ओळखपत्रच सापडत नसल्याने ते खट्टू झाले आहेत. त्यांनी नाराज होण्याची गरज नाही. कारण त्यांना वोटर आयडी, मतदान कार्ड नसलं तरी मतदान करता येणार आहे. पण त्यासाठी ही कागदपत्रं जवळ बाळगणे आवश्यक आहे. कोणती आहेत ही कागदपत्रं? जाणून घेऊयात..

102 मतदारासंघात लोकशाहीचा उत्सव

  • Lok Sabha Election 2024 मध्ये पहिल्या टप्प्यात देशातील 102 मतदारासंघात लोकशाहीचा उत्सव पाहायला मिळले. देशातील 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन पण करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात मतदान होण्याचा अंदाज आहे.
  • महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी अर्थात तुमच्याकडे मतदान कार्ड असणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावर गेल्यावर तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदान कार्ड मागितले जाते. निवडणूक आयोग मतदान कार्ड देते. त्यासाठी विहित प्रक्रिया आहे.

तरीही करता येणार मतदान

हे सुद्धा वाचा

जर तुमचे मतदान कार्ड हरवलं असेल तर तुम्हाला मतदान करता येतं का? असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत असतो. त्याविषयी निवडणूक आयोगाने खास सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल. Electors Photo Identity Card (EPIC) हरवलं असल्यास तुम्हाला मतदान करता येते. तुम्हाला मतदानाचा अधिकार बजावता येतो. त्यासाठी काही कागदपत्रे मात्र, मतदान करतेवेळी सोबत बाळगणे आवश्यक आहेत.

ही कागदपत्रं आहेत गरजेची

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. पासपोर्ट
  4. छायाचित्रासह बँक अथवा पोस्टाचे पासबुक
  5. मनरेगाचे जॉब कार्ड
  6. आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
  7. चालक परवाना
  8. फोटोसह पेन्शन दस्तावेज
  9. ग्राह्य धरण्यात येणारे इतर सरकारी योजनांचे ओळखपत्र
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.