‘कंडोमचा सर्वाधिक वापर करतात मुसलमान’; पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यानंतर ओवेसींचा पलटवार

AIMIM Asaduddin Owaisi : 'जर काँग्रेस सत्तेत आली तर देशातील संपत्ती त्या लोकांमध्ये वाटण्यात येईल, ज्यांचे सर्वाधिक मुलं आहेत'. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील प्रचारसभेत असे वक्तव्य केले होते. त्यावरुन देशभरात वादळ उठलेले असतानाच आता AIMIM चे प्रमुख ओवेसी यांनी पण पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

'कंडोमचा सर्वाधिक वापर करतात मुसलमान'; पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यानंतर ओवेसींचा पलटवार
ओवेसींनी साधला पंतप्रधानांवर निशाणा
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 10:08 AM

Lok Sabha Election 2024 : राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी प्रचार केला. जर काँग्रेस सत्तेत आली तर देशातील संपत्ती त्या लोकांमध्ये वाटण्यात येईल, ज्यांची अधिक मुलं आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावरुन देशभरात एकच काहूर उठले. विरोधकांनी या विधानाचा खरपूस समाचार घेतला. आता AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पण पंतप्रधानावर निशाणा साधला आहे.

कंडोमचा सर्वाधिक वापर करतात मुसलमान

हैदराबाद येथील एका निवडणूक प्रचारसभेत ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मोदींनी काही दिवसांपूर्वी देशातील मुसलमान हे घुसखोर असल्याचा दावा केल्याचे ओवेसी यांनी सांगितले. घुसखोर तो असतो जो विना परवानगी एखाद्या देशात घुसतो. आमचा धर्म नक्कीच वेगळा आहे. पण आम्ही तर याच देशाचे रहिवासी आहोत. हा देश आमचा आहे. पंतप्रधान म्हणतात मुसलमान अधिक मुलं जन्माला घालतात. पण खरं तर मुसलमानांचा प्रजजन दर घसरला आहे. इतकंच नाही तर भारतात मुस्लीम पुरुष सर्वाधिक कंडोमचा वापर करतात. हे मी नाही, तर सरकारचा रिपोर्ट सागंतो, असा निशाणा ओवेसी यांनी साधला.

हे सुद्धा वाचा

हिंदूंना घाबरविण्यासाठी अशा गोष्टी

हिंदूमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, त्यांना घाबरवण्यासाठी भाजप आणि RSS ची माणसं अशा गोष्टी करतात, असा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला. त्यांचे काम हे द्वेष वाढवणे आहे. हिंदूमध्ये भीती निर्माण करण्यात येत आहे की, देशातील मुसलमान बहुसंख्याक होतील. पण सत्य तर हे आहे की, असे कधी होणार नाही. आमचा धर्म वेगळा असला तरी आम्ही या देशाचे आहोत.

बांसवाडामध्ये पंतप्रधान मोदींचा दावा काय

राजस्थानमधील बांसवाडा येथे निवडणूक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या एका वक्तव्याचा आधार घेतला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यानुसार देशातील संपत्तीवर पहिला अधिका मुसलमानांचा आहे, असा दावा पीएम मोदींनी केला होता. आता काँग्रेस सत्तेत आली तर लोकांची संपत्ती मुसलमानांमध्ये वाटण्यात येईल. ही शहरी नक्षल मानसिकता आई-बहिणींचे मंगळसूत्र पण सोडणार नाही, असा हल्लाबोल मोदींनी केला होता.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.