Lok Sabha Election 2024 : आता बोला, तुमचं मत दुसराच टाकून गेला, तर तुम्हाला मिळेल का मतदानाची संधी?

Lok Sabha Election 2024 Phase 2 Polling : अनेकदा असे प्रकार समोर आलेले आहेत. जेव्हा, मतदाराला हे समजते की, त्याच्याऐवजी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने त्याच्या नावे मतदान केले. जर तुमच्यासोबत पण असाच प्रकार घडला तर करणार काय? याविषयी नियम काय?

Lok Sabha Election 2024 : आता बोला, तुमचं मत दुसराच टाकून गेला, तर तुम्हाला मिळेल का मतदानाची संधी?
दुसऱ्यानेच मतदान केल्यावर तुम्हाला मत टाकण्याचा मिळतो अधिकार?
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 9:22 AM

Lok Sabha Election 2024 मधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, केरळ सहित 13 राज्यातील 88 जागांसाठी मतदान होत आहे. यापूर्वीच्या अनेक निवडणुकीत एक प्रकार पाहायला मिळाला, तो म्हणजे, एका मतदाराच्या नावावर दुसऱ्यानेच मत टाकले. या प्रकारावरुन मतदान केंद्रावर अनेकदा गोंधळ पण झाला. मत प्रक्रिया थांबविण्याची वेळ पण आली. तुमच्यासोबत पण असा प्रकार घडला तर, तुम्हाला, तुमच्या नावावर मत टाकण्याची संधी मिळते का?

ही तर मत चोरी

निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार, या प्रकाराला मत चोरी असे म्हणतात. भारतीय निवडणूक व्यवहार अधिनियम -1961 चे कलम 49 (पी) मध्ये याची माहिती देण्यात आली आहे. 1961 मध्ये निवडणूक आयोगाने या नियमात बदल केला होता. त्याआधारे कोणताही मतदार त्याच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, अशी तरतूद त्यामध्ये करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

तुमच्या नावावर दुसऱ्याचे मतदान, करणार काय?

तुमच्या नावावर दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केले तर काय करणार असा प्रश्न सर्वांनाच पडतो. तिथे गोंधळ घातल्यास मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण केला म्हणून कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी सर्वात अगोदर मतदान केंद्र प्रमुखाला भेटा. त्याला घडलेला प्रकार सांगा. त्याची या प्रकरणातील भूमिका महत्वाची असते. मतदान केंद्राची व्यवस्था ते ईव्हीएमच्या जबाबदारीपर्यंत त्याला अधिकार असतात.

तर करु शकता मतदान

तुम्हाला यावेळी काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तुमच्याकडे तुमचे मतदानकार्ड, निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली मतदान केंद्र स्लिपची मागणी करण्यात येईल. तुमची कागदपत्रे तपासल्यानंतर, झालेली चूक लक्षात आल्यानंतर केंद्र प्रमुख तुम्हाला मतदान करण्याची संधी देऊ शकतो. दुसऱ्याच्या नावावर मतदान करणे हा गुन्हा आहे. अशी व्यक्ती केंद्रावर सापडल्यास, त्याच्याविरोधात तक्रार देण्यात येते.

कसा मिळेल मतदानाचा अधिकार

केंद्र प्रमुखाने मूळ मतदाराला मतदान करण्याची परवानगी दिल्यावर, त्याला बॅलेट पेपरच्या सहायाने मतदान करता येईल. अशा मतदाराला ईव्हीएम मशीन द्वारे मतदान करता येणार नाही. अशा मताला टेंडर वोट असे म्हणतात. त्यासाठी मतदाराला बॅलेट पेपर देण्यात येतो. हा मतदार त्याच्या योग्य उमेदवारासमोर चिन्हांकित करुन पसंती देऊ शकतो. मतदान झाल्यावर एका लिफाफ्यात बॅलेट पेपर सुरक्षित करण्यात येते.

टेंडर वोटचे मूल्य तरी काय

बीबीसीच्या एका वृत्तानुसार, तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी टेंडर वोटबद्दल माहिती दिली होती. त्यानुसार, दोन उमेदवारांना जेव्हा समान मत पडतात. तेव्हा टेंडर वोट ग्राह्य धरण्यात येत नाही. अशावेळी उमेदवाराच्या विजयाचा फैसला हा टॉसने होतो. अर्थात हारणाऱ्या उमेदवाराला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार असतो.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.