आलिशान कारचा ताफा, दुबई-लंडनमध्ये घरं, BJP च्या महिला उमेदवाराकडे कुबेराचा खजिना

Lok Sabha Election 2024 : देशात अनेक श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. आलिशान कारचा ताफा आहे. देशातच नाही तर परदेशात पण कोट्यवधींचे इमले आहे. भाजपच्या या महिला उमेदवाराकडे 1400 कोटींची संपत्ती आहे. तुम्हाला नाव माहिती आहे का?

आलिशान कारचा ताफा, दुबई-लंडनमध्ये घरं, BJP च्या महिला उमेदवाराकडे कुबेराचा खजिना
भाजपच्या धनकुबेर उमेदवार
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 8:02 AM

Pallavi Dempo : भाजपने दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांची पत्नी पल्लवी डेम्पो यांना मैदानात उतरवले आहे. पल्लवी यांनी मंगळवारी त्यांचा उमदेवारी अर्ज दाकल केला. निवडणूक अधिकाऱ्याकडे त्यांनी 119 पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या शपथपत्रानुसार, पती श्रीनिवास डेम्पो यांच्यासह त्यांची एकूण संपत्ती 1,400 कोटी रुपये आहे. डेम्पो समूहाचा व्यवसाय फुटबॉल लीगच्या फ्रंचाईजीपासून ते रिअल इस्टेट, जहाज निर्मिती, शिक्षण, खाण, खनिजकर्म उद्योगापर्यंत पसरलेला आहे.

पल्लवी आहेत धनकुबेर

  1. पल्लवी डेम्पो यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे 255.4 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांचे पती श्रीनिवास यांच्याकडील या संपत्तीचे मूल्य आजच्या बाजाराभावाप्रमाणे 994.8 कोटी रुपये इतके आहे. तर पल्लवी यांच्याकडे 28.2 स्थावर मालमत्ता आहे. तर पतीकडे 83.2 कोटींची मालमत्ता आहे.
  2. श्रीनिवास यांच्याकडे गोवा, देशात पण अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत. इतकेच नाही तर या दाम्पत्याकडे दुबईत पण एक अपार्टमेंट आहे. त्याचे सध्याचे बाजारमूल्य 2.5 कोटी रुपये आहे. इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये पण या दाम्पत्याच्या नावे एक अपार्टमेंट आहे. तिचे सध्याचे बाजारमूल्य 10 कोटींच्या घरात आहे. देशातील मालमत्ता पण कोट्यवधींच्या घरात आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. पल्लवी डेम्पो यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे सध्याच्या घडीला 5.7 कोटींचे सोने आहे. पल्लवी यांनी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 10 कोटी रुपयांचा आयकर रिटर्न दाखल केला होता. श्रीनिवास यांनी त्याच वर्षासाठी 11 कोटी रुपयांचा रिटर्न दाखल केला होता. 49 वर्षीय भाजप उमेदवार पल्लवी यांचे शिक्षण पुण्यातील एमआयटीमध्ये झालेले आहे. त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
  5. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 217.11 कोटींचे बाँड, जवळपास 12.92 कोटींची बचत, 2.54 कोटींच्या कार, जवळपास 5.69 कोटींचे सोने, तर इतर 9.75 कोटी रुपयांच्या वस्तू आहेत.पल्लवी डेम्पो यांनीच नाही तर उत्तर गोव्यातून उमेदवार श्रीपाद नाईक यांनी सुद्धा मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. गोव्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.