Voters | लोकशाहीच्या उत्सवात इतके कोटी मतदार ! महिला मतदार बजावतील मोठा रोल

Lok Sabha Election 2024 Voters | लोकसभा निवडणूक 2024 चे रणशिंग अखेर फुंकले गेले. देशात लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. लोकशाहीच्या या यज्ञात 96.8 कोटी मतदार आहुती टाकतील. त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करतील. अशी आहे आकडेवारी...

Voters | लोकशाहीच्या उत्सवात इतके कोटी मतदार ! महिला मतदार बजावतील मोठा रोल
Follow us
| Updated on: Mar 16, 2024 | 4:29 PM

नवी दिल्ली | 16 March 2024 : अखेर लोकसभेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यावेळी भारतीय मतदार राजाची पॉवर किती मोठी आहे, हे उभ्या जगाला कळले. भारतीय लोकसभा निवडणूक 2024 साठी 96.8 कोटी मतदार त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करतील. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 49.7 कोटी तर महिला मतदारांची संख्या 47.1 कोटींहून अधिक आहे. म्हणजे या लोकसभा निवडणुकीत महिला मतदार महत्वाची भूमिका निभावतील, हे वेगळं सांगायला नको.

हा तर राष्ट्रीय सण

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभेच्या या निवडणुका राष्ट्रीय सण असल्याचे म्हटले. देशात जवळपास 97 कोटी मतदार आहेत.यावर्षात 2024 मध्ये जगभरात निवडणुका होत आहे. हे जणू निवडणुकीचेच वर्ष असल्याचे ते म्हणाले. अवघ्या जगाचे लक्ष भारतीय लोकशाहीच्या या निवडणुकीच्या उत्सवाकडे लागले आहे. सर्वात मोठ्या लोकशाहीत निवडणुका घेणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

10.5 लाख मतदान केंद्रे, 55 लाख ईव्हीएम

मागील 11 राज्यातील निवडणुका या शांततेत पार पडल्या. या निवडणुका हिंसा मुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले. या राज्यांमध्ये जवळ जळव पूनर्मतदानाची गरज पडली नाही, असे ते म्हणाले. याबाबतीत अजून सुधारणा करण्यात येत आहे. देशात जवळपास 97 कोटी मतदार आहेत. 10.5 लाख मतदान केंद्रे असतील. तर या निवडणुकीसाठी 55 लाख ईव्हीएमचा वापर करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीचे शिवधनुष्य 1.5 कोटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

1.82 कोटी मतदार पहिल्यांदाच करतील मतदान

देशात यावेळी एकूण 96.8 कोटी मतदार आहेत. यामध्ये 49.7 कोटी पुरुष तर 47 कोटी मतदार या महिला आहेत. एकूण मतदारांमध्ये 1.82 कोटी मतदार पहिल्यांदाच त्यांच्या मतदानाचा अधिकार वापरतील. या निवडणुकीत ते पहिल्यांदा मतदान करतील. तर 20-29 वयोगटातील 19.47 कोटी मतदार असल्याचे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

12 राज्यांसह केंद्रशासित राज्यात महिला राज

महिला या लोकशाहीच्या उत्सवात महत्वाची भूमिका निभावतील. महिलांचा टक्का वाढला आहे. राजीव कुमार यांच्यामते, महिलांचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा प्रयत्न केला आहे. 12 राज्यांसह केंद्रशासित राज्यात महिला राज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या केंद्रशासित प्रदेशासह राज्यात महिला मतदारांचे लिंग प्रमाण 1000 हून अधिक आहे. म्हणजे महिला मतदारांची संख्या अधिक आहे. लोकसभा निवडणुकीत 85 लाखांहून अधिक महिला पहिल्यांदा त्यांच्या मतदानाचा अधिकार वापरतील.

आयुष्याचं शतक पूर्ण करणाऱ्या मतदानाचा आकडा किती

देशातील लोकशाही उत्सवात ज्येष्ठ नागरिक पण सहभागी होतील. लोकसभेच्या निवडणुकीत 2,18,000 मतदार हे 100 वर्षांचे अथवा त्यापेक्षा अधिक वयाचे असल्याचे मुख्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. तर 82 लाख मतदार हे 85 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक आहे. ट्रान्सजेंडर मतदारांचा आकडा 48000 इतका आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.