जणू सौंदर्याची खाणच… भर निवडणुकीत पोलिंग ऑफिसर ईशा अरोराचे फोटो व्हायरल; कोण आहे ईशा?
देशभरात पहिल्या टप्प्याचा प्रचार संपला आहे. आता दुसऱ्या टप्प्याच्या तयारीच्या कामाला निवडणूक आयोग लागला आहे. आयोगाने निवडणुकीसाठी विविध अस्थापनातील कर्मचारी घेतले आहेत. काल उत्तर प्रदेशातील एका पोलिंग बुथवर एक महिला अधिकारी ड्युटीवर तैनात होती. बँकेत नोकरीला असलेल्या या महिला अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. आता दुसरा टप्पा 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांवर कामाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीचा पारा चढलेला असतानाच एका पोलिंग ऑफिसरचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सौंदर्याची खाणच असलेल्या या पोलिंग ऑफिसरच्या फोटोवर लाइक्सचा पाऊस पडत आहे. अनेक लोक त्यावर कमेंट करून या ऑफिसर महिलेच्या सौंदर्याची तारीफ करताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एका महिला कर्मचाऱ्याला निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली होती. ईशा अरोरा असं या महिलेचं नाव आहे. तो पोलिंग ऑफिसर आहे. गंगोह विधानसभा क्षेत्रातील महंगी गावात ती ड्युटीवर होती. महिलांना निवडणुकीचं काम करताना अडचणी येतात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर ईशा यांनी तात्काळ उत्तर दिलं. निवडणूक आयोगाने अत्यंत चांगली व्यवस्था केली आहे. आम्हाला कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागत नाहीये.
स्टेट बँकेत नोकरीला
ईशा अरोरा स्टेट बँकेत कार्यरत आहे. त्यांची ड्युटी गंगोध विधानसभा मतदारसंघातील महंगी गावातील पोलिंग बूथवर मतदान अधिकारी म्हणून लावण्यात आली होती. वेअर हाऊसमध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यापासून ते पोलिंग बूथवर जाण्यापर्यंत आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. सेक्युरिटी पर्सन आम्हाला चांगली मदत करत आहेत. हा एक उत्तम आणि चांगला अनुभव आहे, असं ईशा यांनी सांगितलं.
लाइक्सचा पाऊस
ईशा या दिसायला अत्यंत सुंदर आहेत. त्या हजरजबाबी आहेत. प्रत्येक प्रश्नांची उत्तरे पॉझिटीव्ह देत आहेत. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायर झाले असून त्यांच्या फोटोला लाइक्स मिळत आहेत. लोक त्यांच्या सौंदर्याची आणि कामाचीही स्तुती करताना दिसत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे 2019मध्ये पिवळ्या साडीतील एका पोलिंग ऑफिसरचा फोटो व्हायरल झाला होता. रीना द्विवेदी असं त्यांचं नाव होतं. त्यांच्या लुक्समुळे त्या प्रचंड फेमस झाल्या होत्या. तर काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील एका महिला अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल झाला होता. आता सहारनपूरमध्ये ड्युटीला असलेल्या या महिला अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल झाला आहे.