Rahul Gandhi : संघाचे कौतुक सोडा, निवडणूक आयोगावर पुन्हा प्रहार; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप काय?

Rahul Gandhi attack on Election Commission : राज्यात महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कौतुकाचा वर्षाव केलेला असला तरी काँग्रेसने संघासह निवडणूक आयोगावर प्रहार केला आहे.

Rahul Gandhi : संघाचे कौतुक सोडा, निवडणूक आयोगावर पुन्हा प्रहार; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप काय?
राहुल गांधी, संघ,
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 1:58 PM

राज्यात महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूक्ष्म नियोजनाची प्रशंसा केली. विधानसभेतील पराभवाचे मंथन करताना या दोन्ही पक्षांनी संघाचे कोडकौतुक केले. पण काँग्रेसने पराभवाचे मंथन करताना संघाची आरती ओवाळली नाही. उलट सरसंघचालक मोहन भागवत आणि निवडणूक आयोगावर तोंडसूख घेतले. काय म्हणाले राहुल गांधी?

निवडणूक आयोगावर प्रहार

महाराष्ट्रात जी निवडणूक झाली ती पूर्णपणे चुकीची आहे. मी निवडणूक आयोगाला सांगितलं आहे की मतदार यादीमध्ये पारदर्शकता ठेवा. पारदर्शकपणे मतदान होणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आम्ही जी माहिती आयोगाकडे मागीतली ती त्यांनी दिली नाही, असा आरोप निवडणूक आयोगाने केला आहे.

हे सुद्धा वाचा

सरसंघचालकांवर साधला निशाणा

देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही, हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य भारतीयांचा अपमान करणारे असल्याचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले. इतर एखाद्या देशात त्यांनी असं वक्तव्य केलं असतं तर त्यांना अटक झाली असती, असे गांधी म्हणाले. राम मंदिर तयार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळाले असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले होते. त्यावर गांधी यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

मोहन भागवतांचं वक्तव्य तरी काय?

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी सोमवारी एक वक्तव्य केले होते. अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरी व्हावी असे म्हणणे त्यांनी मांडले. कित्येक शतकांपासून आक्रमण सहन करणाऱ्या देशासाठी हेच खरं स्वातंत्र्य असल्याचे ते म्हणाले होते.

त्यावरून राहुल गांधी यांनी हा निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले हे दोन विचारांमधील द्वंद आहे. दोन विचारांमधील ही लढाई आहे. संविधान हा आमचा विचार आहे. तर दुसरीकडे संघाचा विचार हा नेमका त्याच्या उलट आहे. देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही, हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य भारतीयांचा अपमान करणारे असल्याचे गांधी म्हणाले.

वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.