Loksabha Election 2024 : India आघाडी बाबत सर्वात मोठी बातमी, VIDEO

India : ठरलं, इंडिया आघाडीत निर्णय कोण घेणार?. इंडिया आघाडीत 25 पेक्षा जास्त पक्ष एकत्र आले आहेत. सर्व विरोधी पक्षांनी मिळून इंडिया आघाडी स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण हा इंडिया आघाडीचा मुख्य उद्देश आहे.

Loksabha Election 2024 : India आघाडी बाबत सर्वात मोठी बातमी, VIDEO
जयंत पाटील, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यातील इतर नेतेही या फोटोत आहेत.
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 11:22 AM

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी आकाराला आली आहे. सर्व विरोधी पक्षांनी मिळून ही आघाडी स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखणं हा इंडिया आघाडी बनवण्यामागचा मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत इंडिया आघाडीच्या पाटना, बंगळुरु आणि मुंबई येथे मोठ्या बैठका पार पडल्या आहेत. प्रत्येक बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक झाली, त्यावेळी संयोजक कोण होणार? लोगो जाहीर केला जाईल, अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात असं घडलं नाही. मुंबईत 13 नेत्यांची समन्यव समिती स्थापन करण्यात आली. आता इंडिया आघाडीने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सध्याच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आहे.

आता इंडिया आघाडीच्या पटना, बंगळुरू आणि मुंबईप्रमाणे बैठका होणार नाहीत. या तिन्ही शहरात इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठका पार पडल्या. वेगवेगळ्या राज्यांचे मुख्मयंत्री, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. इंडिया आघाडीच एक विराट रुप या बैठकांमध्ये दिसलं होतं. आता मात्र यापुढे इंडिया आधाडीच्या अशा बैठका होणार नसल्याची माहिती आहे. इंडिया आघाडीची चौथी बैठक मध्य प्रदेश भोपाळ आणि पाचवी बैठक पश्चिम बंगाल कोलकातामध्ये पार पडणार होती. पण आता या बैठका रद्द झाल्या आहेत. यापुढे इंडिया आघाडीत समन्वय समितीची महत्त्वाची भूमिका असेल. इंडिया आघाडीने स्थापन केलेली 13 जणांची समन्वय समिती निर्णय घेईल.

शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार महत्त्वाची बैठक

इंडिया आघाडीत आता महत्त्वाचा मुद्दा जागा वाटपाचा आहे. कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार? काँग्रेस आघाडीतील महत्त्वाचा आणि मोठा पक्ष आहे. त्यांच्या वाट्याला जागा किती येणार? आघाडीचा संयोजक कोण असेल? यासंबंधी निर्णय अजून झालेला नाही. आता 13 सप्टेंबरला शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होईल. या बैठकीत पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूक आणि 18 तारखेपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची रणनिती ठरेल. .

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.