आता पुन्हा मास्कची सक्ती होणार? देशातील कोणत्या महत्वाच्या ठिकाणी मास्क सक्तीचा करण्यात आला? जाणून घ्या
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ आरोग्य स्थितीची बैठक होत आहे.
नवी दिल्ली : चीनमधील कोरोनाचा होणारा उद्रेक बघता त्याचे लोण भारतात येण्याची शक्यता अधिक आहे. कदाचित भारतात चीनमधून कोरोना आलेला असावा अशी चर्चा सुरू असतांना देशात पुन्हा मास्कची सक्ती होईल असं बोललं जात होतं. त्यातच केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतिने कोरोनाच्या स्थिती बाबत आढावा बैठक घेत खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा अशा सूचना केल्या होत्या. अशी सर्व परिस्थिती असतांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद परिसरात मास्क सक्तीचा केला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मास्क सक्ती उठवण्यात आली होती. संपूर्ण देशात मास्कचा विसरही नागरिकांना पडू लागला होता. परंतु पुन्हा एकदा मास्क लावण्याची वेळ नागरिकांवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली येथे संसद भवनात सुरू असलेल्या अधिवेशनाच्या दरम्यान संसद परिसरात मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. मंत्री, खासदार आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांचा वावर बघता संपूर्ण देशातील लोकप्रतिनिधी असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता संसद परिसरातच मास्क बंधनकारक केला आहे.
#WinterSession: Lok Sabha Speaker Om Birla’s remarks on the rising #COVID19 cases across the world.@ombirlakota @loksabhaspeaker @LokSabhaSectt pic.twitter.com/GeysEjqlcc
हे सुद्धा वाचा— SansadTV (@sansad_tv) December 22, 2022
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ आरोग्य स्थितीची बैठक होत आहे.
संपूर्ण जगात कोरोनाची स्थिती बघता या बैठकीत काही नियम पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये सामाजिक आंतर, मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
कोरोना बाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असतांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद परिसरात मास्क सक्तीचा केला आहे.
एकूणच या निर्णयानंतर देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे नियम लागू केलेल जाण्याची शक्यता आहे.