प्रियकराला बेदम मारहाण, प्रेयसीचे लग्न झाल्यानंतर अशा काही गोष्टी केल्या…, प्रेयसीचे नातेवाईक संतापले
Nalanda News : एका तरुणाला बेदम मारहाण करुन रस्त्यावर सोडलं होतं. त्याला उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला आहे. त्या तरुणाचं वय 22 होतं. त्या तरुणाने प्रेयसीच्या लग्नानंतर अशा काही गोष्टी केल्या की...
नालंदा : बिहार (Bihar Crime News in marathi) राज्यातील नालंदा जिल्हातील (Nalanda News) पीरबिगहा येथील तरुणाला बेदण मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी उजागर येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार त्याची प्रेमकरणात हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी (Bihar Police) तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्या तरुणाचं नाव पिंटू कुमार असं आहे. शेजारच्या गावातील एका तरुणीशी त्याचं अफेअर सुरु होतं. त्या तरुणीचं लग्न झाल्यानंतर तरुणाने असं काही केलं की, संतापलेल्या लोकांनी त्या तरुणाला संपवलं.
लग्नानंतर ती तरुणी फरार झाली होती
मृ्त्यू झालेल्या तरुणाचं तरुणीशी प्रेम संबंध होते. ज्यावेळी या गोष्टीची तरुणीच्या घरच्यांना माहिती मिळाली झाली, त्यावेळी घरच्यांनी गडबडीत त्या मुलीचं लग्न एका ठिकाणी करुन दिलं. लग्नानंतर सुध्दा तो तरुण त्या तरुणीच्या संपर्कात होता. लग्नाच्या काही दिवसांनंतर ती तरुणी ६ जूनला आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी पोलिस स्टेशन गाठलं. ज्यावेळी दोघं सापडली, त्यावेळी पोलिसांनी त्यांना समजून सांगितलं होतं.
उपचारासाठी नेत असताना वाटेत…
तरुणाच्या भावाने सांगितलं की, त्याचा भाऊ खोरमपुरमध्ये शिकण्यासाठी होता. त्या परिसरातून पिंटूचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्या तरुणाला जोरदार मारहाण करण्यात आली. घरच्यांना मोबाईलवरती मारहाण झाल्याची माहिती मिळाली, त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला आहे. तरुणाला मुलीच्या घरच्यांनी मारहाण केली असावी अशी पोलिसांनी शंका आहे. या प्रकरणी सहा लोकांच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे.
ज्यावेळी पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाली, त्यावेळी पोलिस तिथं घटनास्थळी पोहोचले. त्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याचबरोबर शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांना त्या तरुणाची हत्या झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणात पोलिस अधिक चौकशी करणार आहेत. तरुणाच्या घरच्यांची अधिक चौकशी केली जात आहे.