Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder Price : या राज्यात अवघ्या 450 रुपयांत गॅस सिलेंडर, सरकारचे रक्षा बंधन गिफ्ट

LPG Cylinder Price : केंद्र सरकारने घरगुती गॅस धारकांना अनेक महिन्यानंतर मोठा दिलासा दिला. 200 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त झाला. तर या राज्य सरकारने त्यापेक्षा पुढचं पाऊल टाकलं. श्रावण आणि रक्षाबंधना निमित्त गॅस सिलेंडर अवघ्या 450 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला.

LPG Cylinder Price : या राज्यात अवघ्या 450 रुपयांत गॅस सिलेंडर, सरकारचे रक्षा बंधन गिफ्ट
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 5:15 PM

नवी दिल्ली | 29 ऑगस्ट 2023 : गेल्या एका वर्षांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमतींनी घराचे बजेट कोलमडले आहेत. 400-450 रुपयांना मिळणारे गॅस सिलेंडर थेट 1100 रुपयांच्या घरात पोहचले आहे. या दरवाढीमुळे गृहिणी संतापल्या आहेत. घरगुती गॅसच्या किंमती यंदा पण भडकल्या आहेत. बुधवारी, 29 ऑगस्ट 2023 रोजी केंद्र सरकारने अचानक घरगुती गॅसच्या किंमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला. वास्तविक हा निर्णय पण मलमपट्टीसारखाच आहे.गॅस सिलेंडरच्या किंमती अजून कमी असाव्यात अशी ग्राहकांची मागणी आहे. आता या राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. या राज्यात घरगुती गॅस सिलेंडर अवघ्या 450 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे. श्रावण मास आणि रक्षा बंधनाच्या (Raksha Bandhan) निमित्ताने राज्य सरकारने राज्यातील महिलांना ही अनोखी भेट दिली आहे. महिन्याला केवळ 100 रुपये बिल येईल, अशी व्यवस्था राज्य सरकार करत आहे.

या सरकारकडून गिफ्ट

मध्यप्रदेश सरकारने राज्यातील महिलांन ही विशेष भेट दिली आहे. त्यानुसार, श्रावण महिन्यात महिलांना केवळ 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येईल. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. रक्षा बंधन आणि श्रावण मासच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला. या योजनेसह लाडली बहन या उपक्रमातंर्गत इतर पण अनेक लाभ महिलांना देण्यात येत आहेत.

हे सुद्धा वाचा

इतकी होणार बचत

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती 1108 रुपयांच्या घरात आहेत. या महिन्यात राज्यातील महिलांना केवळ 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे एका सिलेंडरमागे जवळपास 658 रुपयांची बचत होणार आहे. आता ही योजना केवळ श्रावण महिन्यापुरतीच मर्यादीत राहील की योजनेला मुदतवाढ देण्यात येईल, याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. राज्य सरकारने याविषयी अधिकृत घोषणा केली नाही.

वीज बिल अगदी कमी

मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी महिलांसाठी अजून एक भेट देण्याचा निर्णय घेतला. वीजेच्या बिलात आता जास्त वाढ होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. दुर्बल घटकातील महिलांसाठी ही योजना असेल. त्यांना दर महिन्याला केवळ 100 रुपये बिल येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. तर मुलींना पोलीस भरतीसाठी 30% हून 35% टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राजस्थान पण नाही मागे

राजस्थान सरकार पण पात्र नागरिकांना केवळ 500 रुपयांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध करुन देत आहे. एलपीजी गॅस सिलेंडरची ही किंमत एप्रिल 2023 पासून लागू होत आहे. आता मध्य प्रदेश सरकारने पण स्वस्तात गॅसचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला हे उघड आहे.

देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.