ऑफीसमध्ये जेवणासाठी खुर्चीवर बसली अन् धाडकन कोसळली, बँकेत महिला ऑफीसरच्या मृत्यूने खळबळ

पुण्यात काही दिवसांपूर्वीच एका 26 वर्षीय महिला चार्टर्ड अकाउंटंटचा मृत्यू झाला. याच वर्षी मार्चमध्ये ती EY कंपनीत रुजू झाली आणि जुलैमध्ये तिचा जीव गेला. कामाच्या दबावामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. अशीच काहीशी घटना आता एका बँकेतही घडली आहे.

ऑफीसमध्ये जेवणासाठी खुर्चीवर बसली अन् धाडकन कोसळली, बँकेत महिला ऑफीसरच्या मृत्यूने खळबळ
जेवणासाठी खुर्चीवर बसली अन् धाडकन कोसळली महिलाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 12:36 PM

पुण्यातील एका 26 वर्षीय सीए तरूणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच आहे. कंपनीतील वर्क प्रेशरमुळे तिचा जीव गेल्याचा दावा कुटुंबियांनी केला होता. या घटनेचे अनेक पडसाद उमटले, ती ताजी असतानाच आता लखनऊनध्ये अशीच एक धक्कारदायक घटना घडली आहे. तेथे HDFC बँकेतील अधिकारी महिलेचा संशयास्पद रितीने मृत्यू झाला. ती दुपारच्या जेवणासाठी ऑफीसमध्ये बसली होती, मात्र तेवढ्यात बेशुद्ध होऊन खुर्चीवरून खाली कोसळली. उपचारांसाठी तिला इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात नेलं पण तेथए डॉक्टरांनी त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे घोषइत केले. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या मंगळवारी गोमतीनगर येथील एचडीएफसी बँकेच्या विभूतीखंड शाखेत महिला अधिकारी जेवणासाठी खुर्चीवर बसली असताना अचानक बेशुद्ध पडली. सदाफ फातिमा असे तिचे नाव असून त्या 45 वर्षांची होती. ही महिला कर्मचारी लखनऊच्या वजीरगंज भागातील रहिवासी आहे.

जेवणासाठी खुर्चीवर बसली अन् धाडकन कोसळली

ही महिला अधिकारी नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी जेवणासाठी खुर्चीवर बसली मात्र काही कळायच्या आत खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. त्यानंतर ला तातडीने रुग्णालयात नेले पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तत्काळ मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. महिला अधिकाऱ्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला असला तरी पोस्टमॉर्टमसाठी रिपोर्ट अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

अशा बातम्या हे देशातील सध्याच्या आर्थिक दबावाचे प्रतीक

लखनऊ मधील या घटनेवरून सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अखिलेश म्हणाले की, लखनऊमध्ये कामाचा ताण आणि तणावामुळे एचडीएफसीच्या एका महिला कर्मचाऱ्याचा कार्यालयात खुर्चीवरून पडून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. “अशा बातम्या देशातील सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या दबावाचे प्रतीक आहेत. या संदर्भात सर्व कंपन्यांनी आणि अगदी सरकारी खात्यांनाही गांभीर्याने विचार करावा लागेल. ही देशाच्या मानव संसाधनाची कधीही भरून न येणारी हानी आहे. अशा आकस्मिक मृत्यूमुळे कामाच्या परिस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित होतात. सेवा किंवा उत्पादनांच्या संख्येत होणारी वाढ हे कोणत्याही देशाच्या खऱ्या प्रगतीचे मोजमाप नव्हे तर नसून माणूस किती मुक्त, निरोगी आणि आनंदी आहे हे आहे.’असे ते म्हणाले.

कमी लोकांना जास्त मेहनत करायला लावतात कंपन्या

“भाजप सरकारच्या अयशस्वी आर्थिक धोरणांमुळे कंपन्यांचा व्यवसाय इतका घसरला आहे की त्यांचा व्यवसाय वाचवण्यासाठी ते काम करण्यासाठी कमी लोकांना अनेक पटींनी काम देतात. अशा आकस्मिक मृत्यूला भाजप सरकार जबाबदार आहे.’ असा आरोपही त्यांनी केला. ‘ या समस्येवर मात करण्यासाठी, कंपन्या आणि सरकारी विभागांनी ‘तत्काळ सुधारणां’साठी सक्रिय आणि अर्थपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत’, असे ते म्हणाले.

जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं.
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग.
म्हणून लाडक्या बहिणीचा जुगाड, योजनेवरून भाजप आमदाराचं धक्कादायक विधान
म्हणून लाडक्या बहिणीचा जुगाड, योजनेवरून भाजप आमदाराचं धक्कादायक विधान.
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल.