लाच प्रकरणी भाजप आमदाराला अटक ; 40 लाखांची लाच घेताना सापडले होते रंगेहाथ
आमदार मदाल हे चन्नागिरी विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार झाले आहेत. 2013 च्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता. त्यानंतर 2018 मध्ये ते पुन्हा विजयी झाले.
चन्नागिरी : कर्नाटकमधील चन्नागिरीमधून भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांना पोलिसांकडून लाचप्रकरणी अटक करण्यात आली आहे. लाचखोरी प्रकरणी अटक करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाकडून नुकताच भाजप आमदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यादिवसांपासून या आमदाराची अटक पक्की होती. लोकायुक्तांच्या एका शाखेने नुकताच आमदार पुत्र प्रशांत मदल याला 40 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.
काही दिवसापूर्वी भाजप आमदाराच्या कार्यालयातून 1.7 कोटी रुपये आणि त्यांच्या घरातून 6 कोटी रुपये सापडले होते. त्याच वेळी लोकायुक्तांकडे लाच मागितल्याचीही तक्रार आली होती.
या प्रकरणी कारवाई केल्यानंतर या आमदाराने कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड (KSDL) च्या अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता. ही लाच तो वडिलांसाठी घेत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.
आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत बंगळुरू पाणी पुरवठा बोर्ड अधिकारी आहे. मात्र उच्च न्यायालयाकडून यापूर्वीही त्यांच्या मुलाला अटक करण्याचे आदेश दिले होते.
मात्र हा घोटाळा केएसडीएलद्वारे रसायनांच्या पुरवठ्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये त्याच्यावर 81 लाख रुपयांची लाच मागितल्याचाही आरोप ठेवण्यात आला आरोप आहे.
आमदार मदाल हे चन्नागिरी विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार झाले आहेत. 2013 च्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता. त्यानंतर 2018 मध्ये ते पुन्हा विजयी झाले.
आठवड्यापूर्वी उच्च न्यायालयाने लाच प्रकरणी त्यांचा निर्णय राखून ठेवला होता. आता हे प्रकरण सरकारी कंपनीला केमिकल पुरवठ्याच्या कंत्राटाशी संबंधित असल्याचेही यावेळी सांगण्यात आले होते. ज्यामध्ये लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.