कधी उष्टी खरकटी काढली तर कधी खड्डे खोदले; व्हायरल बॉय बनला सगळ्यात तरुण महापौर; राहुल गांधींनीही घेतली दखल
विक्रमची दोन वेळा सीआरपीएफ आणि एकदा पोलीस खात्यात नोकरी मिळाली, मात्र त्याने आपल्या संघर्ष काळाची आठवण ठेवत त्यांनी समाज सेवा करण्याचाच विडा उचलला होता.
मुंबईः मनात जर पक्की खात्री केली आणि प्रयत्नांची पराकाष्टा केली तर मग यश हे तुमच्या पायाजवळ अगदी लोळण घेत येते. अशाच एका भन्नाट माणसाच्या आयुष्यातील ही त्याच्या यशाची गोष्ट. हा तरुण कधी सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी जेवण वाढण्याचे काम करत होता, तर कधी कुठेतरी मजूरी केली, अगदी माणसांची उष्टीखरकटीही काढली. आपला अभ्यास सुरू असाताना कधी वडिलांबरोबर खड्डे खोदले तर कधी कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी डोक्यावरून लाकडी वाहून आणली. आज हाच मध्य प्रदेशमधील (Madhy Pradesh) माणूस सगळ्यात तरुण महापौर (Young Mayor) बनला आहे.
संघर्षाची दखल राहुल गांधींनी घेतली
त्याच्या संघर्ष काळातील त्याचे एक एक फोटो आता सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहेत. हा ज्याचा संघर्ष तुम्ही वाचत आहात ती व्यक्ती आहे, छिंदवाडामधील आदिवासी समाजातील विक्रम आहाके (Vikram Aahke) . ज्याच्या संघर्षाची दखल खुद्द काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी घेतली आहे.
सोशल मीडियावरील व्हायरल बॉय
सोशल मीडियावरील हा व्हायरल बॉय आणि छिंदवाडाचा महापौर विक्रम आहाके हा अवघ्या 31 वर्षांचा आहे. त्याची आई अंगणवाडी सेविका तर वडील सामान्य शेतकरी आहेत. विक्रम आहाके हा आज महापौर झाला असला तरी त्यानं कधी कधी कार्यक्रमातून जेवणं झाली की, उष्टी खरकटी तांट उचलली आहे, तर कधी वडीलांबरोबर घरं बांधण्यासाठी लागणारा पाया आणि खड्डेही खोदले आहेत. तर पैशासाठी डोक्यावरून लाकडं वाहून नेली आहेत.
सगळ्यात तरुण महापौर
विक्रमला सरकारी नोकरी मिळाली नाही असं नाही त्याची एकदा सीआरपीएफ तर एकदा पोलीस खात्यात त्याची भरती झालेली. मात्र त्याला समाजासाठी काही तरी करायचे होते म्हणून त्यांनी दोन्ही नोकरीवर पाणी सोडले होते, त्यानंतर तो एकदा काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना भेटून सांगितले की,मला जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात यायचे आहे, तेथूनपासूनच त्यांनी आपल्या संघर्षाचे यशात रुपांतर केले, आणि महापौर पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. तो कमी वयात जसा महापौर बनला आहे तसात त्याने ज्या छिंदवाडामध्ये 18 वर्षे काँग्रेस हद्दपार झाले होते, तिथे त्याने काँग्रेसचे महापौरपद खेचून आणले आहे, आणि पुन्हा एकदा काँग्रेसची प्रतिमा उंचवण्याची प्रतिमा उंचवली आहे.
यशासाठी खरी निष्ठा
विक्रमचे संघर्ष काळातील फोटो व्हायरल झाल्यानंतर तेच फोटो काँग्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेअर करत लिहिले आहे की, आई अंगणवाडीत काम करते, तर वडील शेतकरी आणि मुलगा महापौर आहे. मध्य प्रदेशमधील छिंदवाडा नगरपरिषदेत 18 वर्षानंतर काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या विक्रम आहाकने हेच सिद्ध करून दाखवले आहे की, माणूस आपल्या स्वप्नांसाठी खऱ्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने लढत राहिला तर तो काही साध्य करु शकतो.