Video : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना, फटाक्यांच्या आतषबाजीवेळी आग!
शिवराज सिंह चौहान यांच्या एका कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली आहे. शिक्षण विभागाच्या एका कार्यक्रमात आतषबाजीवेळी आग लागल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे कार्यक्रमांत एकच गोंधळ उडाला
भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या एका कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली आहे. शिक्षण विभागाच्या एका कार्यक्रमात आतषबाजीवेळी आग लागल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे कार्यक्रमांत एकच गोंधळ उडाला. या संपूर्ण प्रकारामुळे शिवराज सिंह यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळतेय.(Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan’s event, a big fire during the fireworks)
मंगळावारी मध्य प्रदेश सरकारच्या शिक्षण विभागाकडून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अभियानाअंतर्गत अनुगूँज – 2021 चं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री इन्दर सिंह परमार यांच्यासह मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या सांगता समारोहादरम्यान मोठी आतषबाजी करण्यात आली. आतषबाजीदरम्यान तिथे आग लागली. त्यामुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला.
आग लागल्याचं समजताच लोक सैरावैरा पळू लागले. त्यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी माईक ताब्यात घेत लोकांना शांततेचं आवाहन केलं आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माईकवरुन सर्वांना शांततेचं आवाहन केलं. तसंच सर्व मुले, शिक्षक आणि पालकवर्गाला योग्य सूचना दिल्या. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली नाही. दरम्यान, चौहान यांनी यावेळी मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना केली. मध्य प्रदेशात मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न कायम सुरु राहतील, असंही त्यांनी सांगितलं.
CM शिवराज सिंह के कार्यक्रम के दौरान आतिशबाजी से लगी आग, मची अफरा-तफरी, देखें वीडियो pic.twitter.com/eX9wUGi6oc
— MP Breaking News (@mpbreakingnews) March 16, 2021
इतर बातम्या :
Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan’s event, a big fire during the fireworks