High Court : बलात्काऱ्याने मुलीला जीवंत सोडलं, तो खूपच दयाळू होता.. हायकोर्टाच्या टिप्पणीची नी शिक्षेची चर्चा

High Court : असेल जरी बलात्कारी, पण तो व्यक्ती खूप दयाळू होता, टिप्पणीची चर्चा

High Court : बलात्काऱ्याने मुलीला जीवंत सोडलं, तो खूपच दयाळू होता.. हायकोर्टाच्या टिप्पणीची नी शिक्षेची चर्चा
जलेबी बाबाला 14 वर्षांची शिक्षाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 9:36 PM

इंदूर : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) उच्च न्यायालयाची एक टिप्पणी सध्या चर्चेचा विषयी ठरली आहे. चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) करणाऱ्या दोषीविरुद्ध निकाल (Order) देताना हायकोर्टाने हे मत व्यक्त केले आहे. ‘बलात्काऱ्याने मुलीला जीवंत सोडलं, तो खूपच दयाळू होता.’ अशी टिप्पणी उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने (High Court Indoor Bench) केली आहे.

न्यायालय निकालपत्रात दोन्ही बाजूचा युक्तीवादाची नोंद करत सरतेशेवटी मत मांडत निकाल देते. या निकालपत्रातील हे मत सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. न्यायालयाने आरोपीची आजीवन कारावासाची शिक्षा कमी करुन ती 20 वर्षे केली आहे.

हायकोर्टाचे न्यायमुर्ती सुबोध अभ्यंकर आणि न्यायमुर्ती एस. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अशा परिस्थितीत, ट्रायल कोर्टात दाखल केलेल्या साक्षी आणि पुराव्यावरुन दोषीला सुनावलेल्या शिक्षेत काही चूक नसल्याचे या कोर्टाच्या लक्षात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

निकालपत्रात न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे,दोषीने चार वर्षांच्या मुलीसोबत हे कृत्य केले आहे. ही बाब महिलेच्या सन्मान आणि प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. चार वर्षांच्या मुलीसोबत असे कृत्य करणाऱ्या या प्रकरणात सुनावणी घेणे उचित मानत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

‘दरम्यान, या तथ्यावर विचार करता की, दोषीने बलात्कारासारखे कृत्य केल्यानंतर लहानगीला जीवंत सोडले ही त्याची दयाळू वृत्ती होती. त्यामुळेच न्यायालयाचे मत आहे की त्याच्या आजीवन कारावासाची शिक्षा 20 वर्षांच्या कठोर कारावासाच्या शिक्षेत रुपांतरीत केली जावी.’ असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

अर्थात निकालाचे हे प्रकरण कुठले आहे आणि आरोपीचे नाव काय आहे, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र निकालपत्रातील टिप्पणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.