Video: जेव्हा भाजपच्या मंत्रीच थेट एअरपोर्टवरच पूजापाठ करायला बसतात
एरवी विमानतळ म्हटले की प्रचंड कडेकोट सुरक्षा पाहायला मिळते. मात्र, उषा ठाकूर यांच्या पूजापाठात विमानतळाचे संचालक आणि कर्मचारी वर्गही सहभागी झाला होता. | Usha Thakur Performs Puja At Airport
इंदूर: संपूर्ण जग अद्याप कोरोनातून बरे करण्याच्या लसीच्या प्रतिक्षेत असताना मध्य प्रदेशातील भाजपच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर (Usha Thakur) यांनी मात्र कोरोनाचा (Coronavirus) नायनाट करण्याचा मार्ग शोधून काढला आहे. उषा ठाकूर यांनी शुक्रवारी इंदूरच्या विमानतळावर कोरोनाला पळवून लावण्यासाठी पूजापाठ केला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Madhya Pradesh minister Usha Thakur performs puja at airport to get rid of Covid-19)
यामध्ये उषा ठाकूर या विमानतळावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोरच्या जागेत ठाण मांडून बसल्याचे दिसत आहे. याठिकाणी त्यांनी पूजेचे साहित्य मांडले होते. यानंतर उषा ठाकूर यांनी काही मंत्रांचे पठण केले. साधरण अर्धा तास त्यांचा हा पूजापाठ सुरु होता. मी कोरोनाला पळवून लावण्यासाठी ही पूजा घातल्याचे उषा ठाकूर यांनी सांगितले. एरवी विमानतळ म्हटले की प्रचंड कडेकोट सुरक्षा पाहायला मिळते. मात्र, उषा ठाकूर यांच्या पूजापाठात विमानतळाचे संचालक आणि कर्मचारी वर्गही सहभागी झाला होता.
उषा ठाकूर या इंदूरच्या महू मतदारसंघाच्या आमदार आहेत. तोंडावर मास्क न घालण्याच्या कारणावरून उषा ठाकूर यांच्यावर अनेकदा टीका करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभा अधिवेशनालाही त्या मास्क न घालता पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांना मास्क न घालण्याचे कारण विचारण्यात आले. तेव्हा मी दररोज हवन करते आणि हनुमान चालिसा म्हणते, त्यामुळे मला कोरोना होणार नाही, असे उषा ठाकूर यांनी म्हटले होते.
अगर आप सोच रहे होगे की यहा कोई सत्संग चल रहा हैं, तो आप बिल्कुल गलत है! यह इंदौर एयरपोर्ट पर मध्यप्रदेश की माo मंत्री उषा ठाकुर बिना मास्क के है, जब उनसे पूछा कि आप क्या कर रही हैं, तो उन्होंने कहा एयरपोर्ट पर पूजा पाठ से करोंना भाग जाएगा !
एक से बढ़कर एक नमूने है भाजपा मै pic.twitter.com/Rr3B2o9VL7
— Shruti Dhore (@StandwithShruti) April 10, 2021
‘सर्व दहशतवादी मदरशांमध्येच तयार होतात’
उषा ठाकूर चर्चेत येण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. यापूर्वी मदरशांविषयी केलेल्या वादग्रस्त केलेल्या वक्तव्यामुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. देशातील मदरशांमध्ये लहान मुलांमध्ये कट्टरतावाद आणि द्वेषभाव रुजवला जातो. याच मदरशांमध्येच दहशतवादी तयार होतात, असे वक्तव्य भाजप नेत्या उषा ठाकूर यांनी केले आहे. मदरशांमध्ये राष्ट्रवादाला सुसंगत असे शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे सरकारने या मदरशांमधील प्रचलित शिक्षण पद्धती मोडून तेथील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, अशी मागणी उषा ठाकूर यांनी केली होती.
संबंधित बातम्या:
सर्व दहशतवादी मदरशांमध्येच तयार होतात, सरकारने बंदी घालावी; भाजपच्या मंत्र्याची मागणी
‘कोरोना को मत डरोना, नियम पाळा, कोरोनाला जाळा’, रामदास आठवलेंची नवी कविता
(Madhya Pradesh minister Usha Thakur performs puja at airport to get rid of Covid-19)