मुंबई : देशात मागच्या तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) सुरु आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, दिल्ली या राज्यात अतिमुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. दिल्लीत नद्यांना पूर आल्यामुळे गाड्या वाहून गेल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. नुकतीच वाहनांवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये चार लोकांचा जागीचं मृत्यू झाला आहे. मोठा ढिगारा अचानक खाली तीन (road accident) वाहनांवरती आला. त्यामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी (madhya pradesh news) जाहीर केली आहे.
मध्यप्रदेश राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. शाम गंगोत्री धामचे दर्शन करुन परत येत असताना वाहनावरती मोठी दगड कोसळली. त्यामध्ये चार लोकांचा जागीचं मृत्यू झाला आहे. तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी लोकांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीमध्ये दोघांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
VIDEO | Three killed as several vehicles get buried under debris from rain-triggered landslide on Gangotri National Highway in Uttarakhand’s Uttarkashi. pic.twitter.com/tx36sF0yGy
— Press Trust of India (@PTI_News) July 11, 2023
जिल्हा प्रशासन रस्ता बंद असल्यामुळे घटनास्थळी उशिरा दाखल झालं. तिथल्या स्थानिक लोकांनी जखमी लोकांना मदत केली, त्याचबरोबर सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. त्यामुळे सात लोकांचा जीव वाचला आहे. मध्यप्रदेशातून आलेल्या तीन वाहनात ३० प्रवासी होते. त्यामधील एका वाहनावरती दरड अधिक कोसळल्याने लोकांचा मृत्यू झाला.
जिल्हा प्रशासनाने सध्या तरी ती यात्रा थांबवली आहे. जी लोकं ज्या ठिकाणी आहेत, तिथं त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गंगोत्री महामार्गावर जो ढिगारा पडला आहे. तो सध्या हटवण्याचं काम सुरु आहे. परंतु सध्या तिथं अधिक मुसळधार पाऊस असल्यामुळं जिल्हा प्रशासनाला अधिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जोपर्यंत सरकारी आदेश येत नाही, तोपर्यंत शाळा सुरु करायच्या नाहीत.