Sidhi Bus Accident : ओव्हरटेक करताना बस 30 फूट खोल कालव्यात, 36 प्रवाशांचा करुण अंत
सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही बस सतनाच्या दिशेने जात असताना अपघात झाला. (Sidhi Bus Accident canal)
भोपाळ : मध्य प्रदेशातील सिधीमध्ये बस 30 फूट खोल कालव्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात (Sidhi Bus Accident) 36 प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. बसमध्ये जवळपास 60 प्रवासी होते. आतापर्यंत सात प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरु असून अद्याप काही प्रवासी बेपत्ता आहेत. (Madhya pradesh Sidhi Bus Accident kills passengers after falling into canal)
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj singh chouhan) यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या भरपाईची घोषणा केली आहे. तर उर्वरित प्रवाशांचा कालव्यात शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही बस सतनाच्या दिशेने जात असताना अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात बस कालव्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बस खोल कालव्यात पडल्यानंतर बुडायला लागली. तेव्हा सात प्रवाशांनी बसच्या बाहेर पडण्यात यश मिळवलं. हे प्रवासी पोहत कालव्याच्या बाहेर पडले. मात्र, इतर प्रवासी बसमध्येच अडकून पडल्याने त्यांना प्राण गमवावे लागले.
MP: A bus, carrying around 54 passengers, fell into a canal in Sidhi after the driver lost control over it. 7 people rescued, search underway for rest of the passengers. A team is present at spot, operation is underway. Bus was going from Sidhi to Satna when the incident occurred pic.twitter.com/clmUfYdoQd
— ANI (@ANI) February 16, 2021
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले. जवळपासच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा शोध घेताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला.
कालवा खोल असल्यामुळे बस क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. बसमध्येच आणखी काही प्रवाशांचे मृतदेह सापडण्याची चिन्हं आहेत.
संबंधित बातम्या :
मध्य प्रदेशात बस 30 फूट खोल कालव्यात कोसळली
(Madhya pradesh Sidhi Bus Accident kills passengers after falling into canal)