जनाची नाही तर मनाची..मदतीचा आव आणून हा त्रास कशाला…
मध्य प्रदेशातील एका प्राथमिक शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. गणवेश मळलेला होता म्हणून गणवेश काढून शिक्षकाने धुतला आणि विद्यार्थिनीला अर्धनग्न अवस्थेत थांबायला लावले.
भोपाळः मध्य प्रदेशात एका शिक्षकाने शाळेतील 10 वर्षीय आदिवासी मुलीला इतर विद्यार्थिनींसमोर (Student) तिचा मळलेला गणवेश काढण्यास सांगितल्याचा प्रकार घडल्याने जोरदार खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता शाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने या घटनेबद्दल माहिती दिली असून शिक्षकाचा कपडे धुतानाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. मुलीला अर्धनग्न अवस्थेत सर्वांसमोर थांबवल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहडोल जिल्ह्यातील जयसिंगनगर विभागातील पौरी येथील बारा टोला, सरकारी प्राथमिक शाळेत (Primary school) हा प्रकार घडला असून या घटनेची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
मध्य प्रदेशातील ज्या सरकारी शाळेतील हा फोटो व्हायरल जाा आहे. त्यामध्ये मुलगी अर्धनग्न अवस्थेत आहे तर शिक्षक श्रवण कुमार त्रिपाठी मुलीचा गणवेश धुताना दिसत आहे.
तर या व्हिडीओमध्ये त्या मुलीबरोबर इतर काही विद्यार्थिनीही तिच्याजवळ थांबल्या असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
या शाळेतील त्या त्रिपाठी नावाच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा गणवेश धुतल्यानंतर तो सुकत बाहेर घातला होता. त्यावेळी त्या शिक्षकाने सांगितले की, गणवेश सुकत नाही, तोपर्यंत विद्यार्थिनीला त्याच अवस्थेत शाळेच्या आवारात अर्धनग्न अवस्थेतच थांबावे लागणार असल्याचे शिक्षकाने म्हटले असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले आहे.
त्यानंतर गणवेश सुकल्यानंतर मुलीला गणवेश परिधान तिला वर्गात पाठवण्यात आले. या घटनेनंतर शाळेतील शिक्षक श्रावण त्रिपाठी यांनी स्वत:ला स्वच्छता मित्र म्हणवून घेत त्या आदिवासी विद्यार्थिनीसोबतचा फोटो काढून शिक्षण विभागाच्या सोशल मीडिया ग्रुपवर शेअर केला होता. त्यानंतर शिक्षण विभागाने कारवाई करत या शिक्षकाला निलंबित केले आहे.
शाळेतील विद्यार्थिनीसोबत असा प्रकार घडल्याचे गावातील नागरिकांच्या लक्षात येताच त्या शाळेतील मुख्याध्यापकांसमोर घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
त्यानंतर या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. हे प्रकरण आदिवासी विभागाच्या आयुक्तांना समजल्यानंतर शिक्षक श्रावण त्रिपाठी या शिक्षकाला निलंबित केले गेले आहे.