विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरु होतं, इतक्यात नक्षली हल्ला; छत्तीसगडमधील घटनेनं देश हादरला

Madhyapradesh Chhattisgarh Assembly Election Voting : मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान परार पडत आहे. या राज्यातील दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे. अशातच छत्तीसगडमधील घटनेनं लक्ष वेधलं आहे. वाचा सविस्तर...

विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरु होतं, इतक्यात नक्षली हल्ला; छत्तीसगडमधील घटनेनं देश हादरला
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 12:16 PM

रायपूर | 17 नोव्हेंबर 2023 : पुढच्या वर्षी देशात लोकसभा निवडणूक होणार आहे. अशात लोकसभेची सेमफायलन म्हणून पाहिल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचं आज मतदान होत आहे. या दोन राज्यातील दिग्गज नेत्यांचं राजकाीय भवितव्य आज मतपेटीत कैद होणार आहे. या दोन राज्यात आत 300 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. मध्यप्रदेशमधील 230 तर छत्तीसगडमध्ये 70 जागांसाठी आत मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र या मतदानावेळी घडलेल्या घटनेने देशाचं लक्ष वेधलं आहे. कारण विधानसभा निवडणुकीचं आज मतदान सुरु होतं. इतक्यात नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला

छत्तीसगडमध्ये आज मतदान होत आहे. अशातच गस्त घालण्यासाठी जात असलेल्या CRPF च्या जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. सीआरपीएफ जवानांच्या टीमवर आणि डीआरजीच्या पथकांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. एकामागोमाग एक IED चा स्फोट केला गेला. दुचाकीवरून जात असलेले 2 CRPF चे जवान थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान, कालच नक्षलवाद्यांकडून मतदानाच्या बहिष्काराचे पोस्टर लावण्यात आले होते. यामुळे यंत्रणा सतर्क झाली. नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रांवर आज मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

मध्यप्रदेशमध्ये आज मतदान

विधानसभेसाठी मध्यप्रदेश राज्यात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मध्यप्रदेशमध्ये 230 जागांवर आज मतदान पार पडतंय. मध्यप्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. बसपा आणि सपा हे देखील ताकदीने या निवडणुकीत उतरले आहेत. मध्यप्रदेशमधल्या बुधनी या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण इथून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात टीव्ही अभिनेते विक्रम मस्तल हे निवडणूक लढत आहेत. तर सपाकडून मिर्ची बाबा मैदानात आहेत.

छत्तीसगडमध्ये आज मतदान प्रक्रिया

छत्तीसगडमध्ये 70 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. छत्तीसगडमधील पाटन या मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचं लक्ष आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल हे पाटनमधून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने बघेल यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्याच घरात उमेदवारी दिली आहे. बघेल यांचा पुतण्या विजय बघेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवाय टीएस सिंह देव, ताम्रध्वज साहू, रवींद्र चौबे यांच्यासह अन्य मंत्र्यांचं राजकीय भवितव्य आज मतपेटीत कैद होणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.