Madrasa : मदरशांमध्ये शिकवणार संस्कृत, उत्तर भारतातील या वक्फ बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Madrasa : या राज्यातील मदरशांमध्ये संस्कृत हा विषय पण शिकवण्यात येणार आहे. राज्यातील मदरसे आता हायटेक करण्यात येणार आहे. त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येत आहे. NCERT च्या अभ्यासक्रमावर आधारीत संस्कृत विषय शिकविण्यात येईल. शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Madrasa : मदरशांमध्ये शिकवणार संस्कृत, उत्तर भारतातील या वक्फ बोर्डाने घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 2:13 PM

नवी दिल्ली | 12 सप्टेंबर 2023 : उत्तर भारतातील या मदरशांमध्ये आता संस्कृत हा विषय (Sanskrit Subject) शिकवण्यात येणार आहे. इतर शाळांप्रमाणेच मदरशे हायटेक आणि मॉर्डन करण्यावर भर देण्यात येणार आहे. बदलत्या जगाचा पासवर्ड मदरशांमधील विद्यार्थ्यांना कळावा. त्यांना सध्याच्या घडामोडीं आणि हायटेक तंत्रज्ञान (High-tech) आत्मसात करता यावे यासाठी मोठा बदल करण्यात येत आहे. शिक्षकांना पण त्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एनसीआरटीच्या (NCERT) अभ्यासक्रमानुसार मदरशातील विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या बदलासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येत आहे. हा बदल झाला तर इंग्रजी शाळांप्रमाणे मदरसे मॉडर्न (Modern Madrasa) होतील, अशी आशा राज्य वक्फ बोर्डाला वाटत आहे. उत्तरेतील कोणत्या राज्यात सुरु आहेत या घडामोडी.

या राज्यात बदल

उत्तराखंड राज्यात हा बदल होत आहे. राज्य वक्फ मंडळाने याविषयीचा निर्णय दिला आहे. मार्च 2024 मध्ये उत्तराखंडमध्ये हा बदल दिसेल. मॉर्डन मदरसा आकाराला येतील. उत्तराखंडमध्ये 117 मदरसांना मॉर्डन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 4 मदरशांना मॉर्डन करण्यात येणार आहे. मदरशांना मुलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहे. मदरशांना फर्निचरसह संगणक कक्ष आणि इतर मॉर्डन शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा देण्यात येणार आहे. अमुलाग्र बदल करण्याचा हा निर्णय राज्य वक्फ बोर्डाने घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

आता शिकविणार संस्कृत

मॉर्डन मदरशांमध्ये संस्कृत ही भाषा पण शिकविण्यात येणार आहे. TV9 ने याविषयी उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांची प्रतिक्रिया जाणून घेतील. एनसीईआरटी अभ्यासक्रमात सर्वच विषय आहेत. त्यानुसार संस्कृत हा विषय आहे. केवळ संस्कृतच नाही तर इतर भाषा सुद्धा मॉर्डन मदरशांमध्ये शिकविण्यात येणार असल्याचे शम्स यांनी स्पष्ट केले. त्यामुळे इतर भाषांची माहिती पण मदरशांमधील विद्यार्थ्यांना होणार आहे. पायाभूत सोयी-सुविधा पण देण्यात येणार आहे. हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

मदरशांमध्ये ड्रेस कोड

मॉर्डन मदरशांमधील विद्यार्थ्यांसाठी आता ड्रेस कोड लागू असेल. शम्स यांच्या म्हणण्यानुसार, कुर्ता पायजमा हा काही मदरशांचा ड्रेस कोड नाही. आता वक्फ बोर्ड मदरशातील मुले कोणता गणवेश घालून येतील याचा निर्णय घेणार आहे. मुलांना गणवेश लागू करणे हे प्राथमिक काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मदरशांमधील मुलं पण सुटा-बुटात दिसून येतील.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.