इंग्रजी सोडा, हिंदीचीही कविता पोरकी..शिक्षणाची इथे ऐशीतैशी
शाळेतील सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना वाचायला दिलं, लिहायला दिलं तरी काहीच आलं नाही. म्हणून मग थेट सरकारलाच या शाळांचा अहवाल पाठवण्यात आला.
नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका शिक्षण अहवालामुळे धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सरकारकडून मदरशांच्या (madrassa) सर्वेक्षणाचे काम सुरू केले गेले आहे. त्यामध्ये देवरियामधील मदरशांचीही तपासणी केली गेली आहे. या यादीत 40 पेक्षा जास्त मदरशांची नावं आहेत. देसोही देवरिया विभागामध्ये सर्वाधिक मदरसे आढळून आले असून जिल्हा अल्पसंख्याक अधिकाऱ्यांनी तपासणी सुरु केल्यानंतर मात्र धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील देवरियामधील जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी नीरज अग्रवाल यांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की, मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीबाबतचा 12 मुद्यांमध्ये शासनाला अहवाल पाठविला गेला आहे.
सर्वेक्षणादरम्यान मदरशाचे नाव, तो चालविणाऱ्या सोसायटीचे नाव, शिकणाऱ्या मुलांची संख्या, कोणता अभ्यासक्रम शिकवला जात आहे. निधी कुठून येतो याबाबतची सविस्तर माहिती सरकार दिली गेली आहे.
सर्वेक्षणादरम्यान जिल्हा अल्पसंख्याक अधिकाऱ्यांनी मुलांना इंग्रजी व हिंदी भाषेतील पुस्तके वाचण्यासाठी दिली होती. तर वर्गात जाऊन त्यांना काही गणिताचे प्रश्न व शाळेत लावलेल्या तक्त्त्यांविषयीही विचारणा करण्यात आली. त्यानंतर मुलांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आले नाही. तर काही मुलांना हिंदीतील शब्दही उच्चारता आले नाहीत.
या विभागातील मरकज अल हुदा मदरशातील सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ट्विंकल- ट्विंकल लिटल स्टार ही कविता आणि हिंदीतीलही कोणतीही कविता विद्यार्थ्यांना वाचता आली नाही. त्यानंतर शाळेत असलेले तक्ते वाचायला सांगितल्यानंतर त्यांना ते सांगता आले नाहीत.
गौरीबाजारच्या जमियत उलूम मदरशातील तिसरी आणि चौथीत शिकणाऱ्या मुलांना हिंदी वाचता आले नाही. तर गौरीबाजारचे माजी अध्यक्ष अब्दुल हकीम यांच्या कुटुंबातील हा मदरसा आहे.
यावर मदरसा संचालकांनी सांगितले की, त्यांच्या निधीचा आधार फक्त देणगी असल्याचेच कारण त्यांनी सांगितले.
मरकज अलहुदाचे संचालक मोहम्मद शाहिद यांनी सांगितले की, हा मदरसा सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. येथे एकूण 39 मुले असून त्यामध्ये 10 स्थानिक आहेत आणि इतर इतर राज्यातूनही येथे आले आहेत.
मदरशातील शाळांसाठी 9 ते 10 लाख रुपयांची वर्षातून एकदा देणगी मिळत असते. तर या शाळांमधून फक्त 6 शिक्षक असल्यामुळेही त्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम झाला आहे.
याशिवाय जामिया तुल उलूम नावाच्या मदरशाचे शिक्षक सादिक यांनी सांगितले की, येथे 16 मुले शिकतात. याठिकाणी बिहार आणि उत्तर प्रदेशातून मुलं शिकायला येत असून अधिकाऱ्यांना मुलं घाबरल्यामुळे त्यांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत.
देसही देवरिया येथे केलेल्या सर्वेक्षणात नोंदणी नसलेले दोन मदरसे आढळून आले. बारवामी छपरच्या मदरशात 130 मुले शिकत असून त्यापैकी 100 गावातील, 13 बिहार आणि 17 बंगालमधील असल्याचे सांगण्यात आले.
मदरशांची अवस्थाही चांगली आहे असं नाही मात्र कौलारु असणाऱ्या मदरशामध्येही 150 मुलं शिकतात तर त्यातील 100 वसतिगृहात राहतात आणि 50 आसपासच्या गावातील आहेत.
गौरी बाजार येथील मदरशाची चौकशी केल्यानंतर समजले की, जमियातूल मदरशात 16 मुले शिक्षण घेतात. त्यामधील 6 बिहारच्या अररिया जिल्ह्यातील आहेत.
तर उर्वरित 10 इतर जिल्ह्यांमध्ये राहतात. तर मरकज मदरशामध्ये 39 मुलं असून मुलांसाठीचा निधी हा गावातील लोकांकडून देणगी रुपाने घेऊन मदरसे चालवले जातात.
सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मदरशांविषयी टिपणी करताना सांगितले की, वर्षभरात लाखो रुपयांची देणगी मिळत असते आणि त्यातूनच मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाते. तर अनेक मदरशांची नावं ही फक्त उर्दूमध्येच लिहिली जातात हिंदीमध्ये त्यांची नावं अजिबात लिहिली जात नाहीत.