Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahakumbh Stampedes History : तेव्हाही मौनी अमावस्या ठरली होती काळरात्र, चेंगराचेंगरीत ८०० जणांचा मृत्यू, कुंभमेळा अन् चेंगराचेंगरीचा असा इतिहास

Mahakumbh Stampedes history: मौनी अमावस्येच्या महास्नानाच्या दिवशी मंगळवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास संगम घाटावर झालेल्या चेंगराचेंगरीत १४ श्रद्धाळूंचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा काही पहिलाच अपघात नाही. कुंभमेळा या सोहळ्याला अपघातांचा कटू इतिहास आहे.

Mahakumbh Stampedes History : तेव्हाही मौनी अमावस्या ठरली होती काळरात्र, चेंगराचेंगरीत ८०० जणांचा मृत्यू, कुंभमेळा अन् चेंगराचेंगरीचा असा इतिहास
Follow us
| Updated on: Jan 29, 2025 | 2:59 PM

कुंभमेळा या पृथ्वीवरील सर्वात मोठा धार्मिक सोहळा आहे. ४० कोटी लोक या महामेळाव्यात यंदा शाही स्नान करतील अशी आकडेवारी जारी झाली होती. अमेरिकेची लोकसंख्या ३४ कोटी इतकी आहे. यावरुन तुम्हाला अंदाज येऊ शकते की महाकुंभ मेळाव्याला सर्वात पवित्र स्नानाचा दिवस असलेल्या मौनी अमावस्येला किती लोक जमले असतील. या मंगळवारी रात्री संगम घाटाकडे निघालेला जथ्था सर्व बॅरिकेट्स तोडून अनेकांना तुटवडत पुढे गेल्याने अनेकांचे मृत्यू झाले आहे. गर्दीच्या मानसशास्रानुसार जो तो आपला स्वत:चा जीव वाचवायला जातो. या दुर्घटनेत पाठून एवढा प्रेशर होता कि पुढे जाणेच त्यांच्या हातात होते आणि मग व्हायचे तेच झाले या अपघातात १४ लोक ठार झाल्याची आकडेवारी दिली जात आहे. तर ५० हून अधिकजण जखमी झाले आहेत.

या चेंगराचेंगरीनंतर सर्व १३ आखाड्यांनी मौनी अमावस्येचे अमृत स्नान अखेर रद्द केले आहे.महाकुंभमध्ये आज बुधवारी मौनी अमावस्येचे महाशाही स्नान होते. या कारणाने येथे जवळपास ५ कोटी श्रद्धाळू जमले होते. अमृतस्नानामुळे सर्व तरंगते पूल बंद केले होते, त्यामुळे ज्याला त्याला गंगेत डुबकी मारायची होती.त्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. बॅरिकेट्समध्ये अडकून काही लोक पडले. आणि अफवा पसरून गर्दी सगळ्यांना तुडवत पुढे गेली आणि अपघात घडला…

Mahakumbh:  2025  Stampedes

हे सुद्धा वाचा

कुंभ मेळाव्याच्या ठिकाणी मौनी अमावस्येला चेंगराचेंगरी झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला चेंगराचेंगरी होऊन ८०० जण ठार झाले होते. चला तर कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचा कटू इतिहास काय आहे ?

मौनी अमावस्या : प्रयागराजमध्ये अमृतस्नानाच्या दिवशीच ८०० जण मृ्त्यूमुखी पावले होते…

तारीख होती ३ फेब्रुवारी १९५४. स्थळ प्रयागराज ( तेव्हा अलाहाबाद ) मौनी अमावस्याच्या पवित्र स्नानासाठी लाखो श्रद्धाळू अमृत स्नान करण्यासाठी पोहचले होते. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या कुंभ मेळ्यात तेव्हा चेंगराचेंगरीला एक घटना कारणीभूत ठरली होती. एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेल्याने जीव वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. परिस्थिती एवढी बिघडली की चेंगराचेंगरी झाली सर्वत्र अफरातफर माजली. लोक किंचाळत होते. सगळीकडे आक्रोशपसरला होता.

या घटनेत ८०० लोकांचा प्राण गेल्याने हत्तींवर नंतर बंदी घालण्यात आली. कुंभ मेळ्यात हत्तींचा प्रवेशावर निर्बंध लादले ते कायमेचे झाले. अनेक मीडियातील बातम्यांनुसार तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या आगमनाने गर्दी वाढविल्याचे म्हटले जाते. त्यांच्यासाठी केलेल्या संरक्षक उपाययोजनांमुळे कुंभच्या सुरक्षेवर परिणाम झाल्याचे म्हटले जात आहे. बीबीसीच्या बातमीनुसार मात्र पंडित जवाहर लाल नेहरुंनी कुंभ मेळ्याच्या आयोजनाची स्थितीची पाहणी एक दिवसआधीच केलेली होती. त्यामुळे घटनेच्यावेळी ते तेथे उपस्थित नव्हते असे बीबीसीच्या बातम्यात म्हटले आहे.

या दुर्घटनेनंतर सरकारने धडा घेतला आणि धार्मिक समारंभासाठी आपली रणनिती बदलली. कुंभ मेळ्यात प्रत्येक क्षणाची माहिती देण्यासाठी लाऊडस्पीकर लावण्याची सुरुवात केली. लाईटच्या व्यवस्थेवर देखील खास लक्ष ठेवण्यात आले. १९५४ च्या दुर्घटनेनंतर पंडित नेहरु यांनी गर्दी टाळण्यासाठी कुंभ मेळा सारख्या प्रमुख स्थळांवर व्हिआयपींच्या दौऱ्यांवर बंदीच घातली.

उत्तर प्रदेश सरकारने या नंतर अनेक पावले उचलली आहे. संगम तटावर अस्थायी हॉस्पिटलची उभारणी केली. हरवलेल्या व्यक्तींसाठी बूथ उघडले. अनेक उपाययोजना केल्या.

कुंभमध्ये चेंगराचेंगरीचा इतिहास

१९८६ : हरिद्वार कुंभमध्ये २०० लोकांचे प्राण गेले

साल १९८६ मध्ये हरिद्वारमध्ये आयोजित कुंभ मेळ्यात त्यावेळी चेंगराचेंगरी झाली जेव्हा उत्तर प्रदेशचे तात्कालिन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि खासदारांसह हरिद्वारल पोहचले. त्यावेळी सर्वसामान्यांना सुरक्षारक्षकांनी रोखले. तेव्हा गर्दी बेकाबू झाली. त्यावेळी २०० जणांचे प्राण गेले होते.

२००३ : नाशिकमध्ये ३९ जणांचा मृत्यू ,१०० जखमी

साल २००३ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक येते कुंभमेळाव्यात पवित्र स्नानाच्या वेळी गोदावरी नदीत हजारो लोक तीर्थ यात्रेला एकत्र आले. या चेंगराचेंगरीत महिलांसह ३९ जण ठार झाले आणि १०० जण जखमी झाले होते.

२०१३ : प्रयागराजमध्ये पादचारी कोसळ्याने ४२ जणांचा मृत्यू

साल २०१३ मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित कुंभमेळाव्यात चेंगराचेंगरी झाली होती. १० फेब्रुवारी २०२३ रोजी अलाहाबाद येथील रेल्वे स्थानकावर पादचारी पुल कोसळू्ल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. यात ४२ जणांचा मृत्यू झाला तर ४५ जण जखमी झाले.

सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार.
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार.
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल.
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?.
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्...
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्....
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार.