‘सर्वपक्षीयांनी एक दिवस महाराष्ट्र बंद ठेवून मराठी भाषिकांच्या पाठीशी राहा’; सीमावासीय पंतप्रधान, गृहमंत्र्यांना हाक देणार

कर्नाटकमध्येही हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यावेळीही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून पुन्हा एकदा कर्नाटककडून तिच री ओढण्यात आली.

'सर्वपक्षीयांनी एक दिवस महाराष्ट्र बंद ठेवून मराठी भाषिकांच्या पाठीशी राहा'; सीमावासीय पंतप्रधान, गृहमंत्र्यांना हाक देणार
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 6:48 PM

कोल्हापूरः गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रचंड तापला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठका झाल्या होत्या. त्या होऊनही मंगळवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला कर्नाटकची एक इंचही जमीन देणार नाही अशी मागच्याच वादाची री त्यांनी ओढली. त्यामुळे सीमावाद आता पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हं दिसून येत आहेत. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांनी आता चलो कोल्हापूरचा नारा दिला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीने चलो कोल्हापूरचा नारा देत 26 डिसेंबर रोजी बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे 1000 हून अधिक कार्यकर्ते कोल्हापुरात येणार असल्याचे म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कर्नाटकातील मराठी भाषिकांवर सातत्याने कन्नडिगांकडून अन्याय आणि अत्याचार केला जात आहे. मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार नाकारले जात असल्याने आता सीमावासियांनी चलो कोल्हापूरचा नारा दिला आहे.

बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चलो कोल्हापूरचा नारा देत. महाराष्ट्रातील सर्वपक्षीयांनी एक दिवस महाराष्ट्र बंद ठेवून सीमावासियांच्या पाठीशी असल्याचे दाखवून द्यावे अशी मागणी केली आहे.

यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्नाटक सरकारकडून वारंवार मराठी भाषिकांवर अन्याय केला जात असल्याने आता म. ए. समितीने चलो कोल्हापूरचा नारा दिला आहे. त्यामुळे आता हा प्रश्न कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकमध्येही हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यावेळीही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून पुन्हा एकदा कर्नाटककडून तिच री ओढण्यात आली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अमित शाह यांच्या भेटीनंतरही त्यांनी महाराष्ट्राला एक इंचही जमीन आम्ही देणार नाही असं स्पष्ट सांगितले.

बसवराज बोम्मई यांच्या या भूमिकेमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना आता तीव्र झाल्यामुळेच त्यांनी चलो कोल्हापूरचा नारा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांतर्फे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना निवेदन देऊन या वादात काय फरक पडणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.