Aditya Thackeray : आमचे चलो कार्ड देशातल्या सगळ्या बसमध्ये आणि रेल्वेत चालेल : आदित्य ठाकरे
आदित्या ठाकरे यांनी, देशातील बेस्ट बस आणि मेट्रो स्थानकांसाठी सुरू करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वर रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगितले.
मुंबई : राज्यात सध्या भोंगे आणि हनुमान चालीसावरून जोरदार राजकारण सुरू आहे. याकारणामुळे भाजप आणि महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) आमने-सामने आली आहेत. तर खासदार नवनीत राणा आणि किरीट सोमय्या प्रकरणावरून आता केंद्राने राज्याकडे अहवाल मागवला असून केंद्रानेही राज्यावर डोळे वटारले आहे. त्यामुळे भविष्यात राज्यात सुरू असलेली हमरीतुमरी दिल्लीतही पहायला मिळेल असे चित्र सध्या आहे. याच दरम्यान राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे दिल्ली दौर्यावर गेले असून त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे. त्यावरून चर्चा सुरू आहेत. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांची दिल्लीतील रेल्वे भवन येथे भेट घेत राज्यातील विविध रेल्वे प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या.
रेल्वेमंत्र्यांशी चर्चा
यावेळी आदित्या ठाकरे यांनी, देशातील बेस्ट बस आणि मेट्रो स्थानकांसाठी सुरू करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वर रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगितले. तसेच NCMC अंतर्गत मुंबईतही रेल्वे एकत्रीकरणाची प्रक्रिया वेगवान करण्याची आम्ही त्यांना विनंती केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
कार्ड हे बेस्ट बस आणि मेट्रोसाठीही वापरले जावे
त्याचबरोबर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यांशी सकारात्मक भेट झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर याबैठकीनंतर त्यांनी,धारावी बाबत जे बोलणे व्हायला हवे होते ते झाले. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे बेस्ट बस आणि मेट्रोसाठीही वापरले जावे अशी मागणी केल्याचे ही त्यांनी सांगितले.
Maharashtra Environment & Tourism Minister, Aaditya Thackeray called on Railways Minister, Ashwini Vaishnaw at Rail Bhavan in Delhi, today.
Thackeray discussed various rail issues concerning the state. pic.twitter.com/p7ClafJgtB
— ANI (@ANI) April 26, 2022
Delhi | We had discussion with Rail Minister on National Common Mobility Card (NCMC) that has been introduced for BEST buses & metro stations in country. We’ve requested him to expedite process of integrating railways in Mumbai under this too:Maharashtra Min Aaditya Thackeray pic.twitter.com/PL3GpXs0Dy
— ANI (@ANI) April 26, 2022