Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Updates: पुढील 5 दिवस आणखी मुसळधार; ‘या’ राज्यांना पुन्हा पुराचा फटाका बसणार; विदर्भातही कोसळणार जोरदार…

गेल्या दोन तीन दिवसांपासून काही भागात पावसाने उसंत घेतली असली तरी मध्य प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Rain Updates: पुढील 5 दिवस आणखी मुसळधार; 'या' राज्यांना पुन्हा पुराचा फटाका बसणार; विदर्भातही कोसळणार जोरदार...
ही प्रतिमा प्रातिनिधीक आहेImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 2:32 PM

मुंबईः गेल्या दोन तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी महाराष्ट्राशेजारील राज्यातून मात्र मुसळधार पाऊस (Heavy Rain) होत आहे. मान्सूनच्या (Monsoon) दुसऱ्या टप्प्यात गेल्या अनेक दिवसांपासून बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र (Maharashtra Rain), गुजरात, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून हवामान खात्याकडून येत्या काही दिवसात विविध राज्यांच्या हवामाना खात्याच्या सुचनेनुसार सांगितले आहे की, आसाम, मेघालय, तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे काही भागात पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने (IMD) तमिळनाडू, मेघालय इत्यादी राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

विदर्भात रविवारपासून कोसळणार

हवामान खात्याच्या ट्विटच्या माहितीनुसार विदर्भात 28 ऑगस्ट, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 25 ते 28 ऑगस्ट 2022 दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे. तर 27 ऑगस्ट रोजी ओडिशामध्ये, 27 ते 29 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये आणि 27 आणि 28 ऑगस्ट रोजी दक्षिण पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.

पुढील 5 दिवस मध्यम आणि जोरदारही

हवामान खात्याच्या माहितीनुसार नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 27-29 ऑगस्ट आणि 25-29 ऑगस्ट दरम्यान आसाम आणि मेघालयमध्ये पुढील पाच दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर याचवेळी 27 ऑगस्ट रोजी अरुणाचल प्रदेश आणि आसाम आणि मेघालयमध्ये मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उत्तराखंडमध्ये धोका

त्याचबरोबर 25 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमध्ये, 28 ऑगस्टला हिमाचल प्रदेशात आणि 28 आणि 29 ऑगस्टला उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर दक्षिण कर्नाटकात 26 ऑगस्टला, तेलंगणात 27 व 28 ऑगस्टला आणि तामिळनाडूमध्ये पुढील पाच दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.