कर्नाटकात महाराष्ट्राची बस पुन्हा फोडली, अज्ञातांनी दगडफेक करून पळ काढला…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. सीमावाद सामोपचाराने मिठवण्याच्या सूचना देऊनही आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बसवर कन्नडिगांनी दगडफेक करून बस फोडण्यात आली आहे.

कर्नाटकात महाराष्ट्राची बस पुन्हा फोडली, अज्ञातांनी दगडफेक करून पळ काढला...
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 6:03 PM

बेळगावः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादाबाबत बैठक घेऊन चर्चा केली होती. आणि त्यावेळी शांततेचेही आवाहन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राला एक इंचही जमीन आम्ही देणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळले होते. सीमावादावरून वाद विकोपाला जाऊ नये म्हणून महाराष्ट्रातील दोन मंत्री आणि खासदार धैर्यशील माने यांनी बेळगाव दौरा रद्द केला होता.

महाराष्ट्राकडून सीमावादाबाबत सामोपचाराची भूमिका घेऊनही आज बेळगावजवळील कुरीहाळमध्ये महाराष्ट्र डिपोची कालकुंद्री-आजरा बसवर दगडफेक करून बस फोडण्यात आली.

सीमावादावरून बसवर दगडफेक करण्यात आल्याने कुरीहाळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर कन्नडिगांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत.

काही दिवसापूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादाबाबत ट्विट केल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात आलेल्या वाहनांची कन्नडिगांकडून तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा महाराष्ट्राच्या बसवर कन्नडिगांनी हल्ला केल्यामुळे परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.एकीकडे कें

द्रीय गृहमंत्री बसवराज बोम्मई दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत सीमावाद चर्चा करून हा वाद सामोपचाराने मिठवण्याच्या सूचना करतात. तर दुसरीकडे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर ट्विट आणि भाष्य केली जात आहेत.

त्यामुळे हा वाद मिठवणार की नाही असा सवाल आता सीमाभागातील मराठी भाषिकांकडून केला जात आहे. सीमाभागात आज महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक करण्यात आल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण बनले आहे.

सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर बसवराज बोम्मई यांनी दावा केल्यानंतर सीमावादाची नव्याने ठिणगी पडली होती. त्यानंतर सातत्याने कर्नाटककडून चिथावणीखोर वक्तव्य केली गेली. त्यानंतरही बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राला एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही अस वादग्रस्त वक्तव्य करून चिथावणी देण्याचे काम केले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.