Mahua Moitra : ‘ती बॉसचा पायजमा पकडण्यात..’ तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पुन्हा ओढवून घेतला वाद; महिला आयोगाच्या अध्यक्षांचा अनावर संताप
Mahua Moitra On NCW Chief Rekha Sharma : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार महुआ मोईत्रा या बेधडक वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. त्यातून त्या वाद ओढावून घेतात. आता ही त्यांच्या या टीकेनंतर नवीन वादाला फोडणी बसली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार महुआ मोईत्रा या त्यांच्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यापूर्वी त्यांनी संसदेत केलेली भाषणं गाजलेली आहेत. आक्रमक भाषणांसाठी त्या ओळखल्या जातात. पण त्यातून अनेक वाद निर्माण होतात. आता ही त्यांनी एक वाद अंगावर ओढावून घेतला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांच्या वक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर मोईत्रांनी दिल्ली पोलिसांना थेट आव्हान दिले आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण?
महिला आयोग हाथरसमध्ये
उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी झाली. त्यात 121 जणांचा बळी गेला. या ठिकाणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा 3 जुलै रोजी गेल्या होत्या. या विषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला. त्यात एक व्यक्ती शर्मा यांच्या डोक्यावर छत्री धरुन उभा असल्याचे दिसले. त्या व्हिडिओवर पत्रकार निधी राजदान यांनी टीका केली. शर्मा यांना छत्री सुद्धा हातात धरता येत नाही का? असा सवाल त्यांनी विचारला.
VIDEO | Hathras stampede: National Commission for Women Chairperson Rekha Sharma arrives at the site of stampede.#HathrasStampede #HathrasNews
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/YaG9wpUlzG
— Press Trust of India (@PTI_News) July 3, 2024
महुआ यांच्या कमेंटने उफाळला वाद
दरम्यान राजदान यांच्या या कंमेटवर खासदार महुआ मोईत्रा यांनी प्रतिक्रिया दिला. ‘ती आपल्या बॉसचा पायजमा पकडण्यात गुंतलेली आहे’, अशी अभद्र टिप्पणी मोईत्रा यांनी केली. त्यावरुन एकच गोंधळ उडाला. राष्ट्रीय महिला आयोगाने ही टिप्पणी अत्यंत अपमानजनक असल्याने मोईत्रांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 79 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मोईत्रांचे पोलिसांना आव्हान
दरम्यान खासदार मोईत्रा यांच्या अजून एका ट्विटने वादाला फोडणी बसली. ‘मला अटक करायची असेल तर मी नादियात’, असल्याचे आवाहन त्यांनी दिल्ली पोलिसांना केले. महिला आयोगाच्या आदेशावर लागलीच कारवाई करा. पुढील तीन दिवस आपली गरज असेल आणि अटक करायचे असेल तर नादियात या, असे त्यांनी स्पष्ट केले.
Come on @DelhiPolice please take action immediately on these suo moto orders. Am in Nadia in case you need me in the next 3 days to make a quick arrest. I Can Hold My Own Umbrella . https://t.co/pXvRSVSzxa
— Mahua Moitra (@MahuaMoitra) July 5, 2024
भाजपमधून हल्लाबोल
त्यानंतर हा वाद वाढतच गेल्याचे दिसते. भाजप गोटातून महुआ यांच्यावर हल्लाबोल सुरु झाला. भाजपचे विविध राष्ट्रीय पदाधिकारी यांनी मोईत्रांवर कारवाईची मागणी केली. त्यात भाजप नेता शाजिया इल्मी यांनी महुआ यांचा एक फोटो शेअर केला. त्यात एक व्यक्ती मोईत्रावर छत्री धरुन उभा असलेला दिसत आहे. काही नेत्यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली.