Mahua Moitra : तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर FIR, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षावरील टिप्पणी भोवली

FIR Against MP Mahua Moitra : तृणमूल काँग्रेसच्या खासदार यांनी काल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांवर अश्लाघ्य टिप्पणी करत वाद ओढवून घेतला होता. तर दिल्ली पोलिसांना अटक करण्याचे आव्हान दिले होते. आज त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Mahua Moitra : तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर FIR, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षावरील टिप्पणी भोवली
महुआ वादात, गुन्हा पण दाखल झाला
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 6:21 PM

गेल्या वर्षी कॅश फॉर क्वेरीचा आरोपात अडकलेल्या TMC च्या खासदार महुआ मोईत्रा यांनी नाहक एक वाद ओढावून घेतला आहे. त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. दिल्ली पोलीसच्या विशेष शाखेच्या सायबर युनिटने हा गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्याविरोधात BNS चे कलम 79 अंतर्गत FIR नोंदविण्यात आला आहे. महुआ यांनी समाज माध्यमावर एका पत्रकाराने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर कमेंट करताना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांवर खालच्या पातळीची टीका केली होती. त्यानंतर हा वाद भडकला. आयोगासह भाजपने महुआविरोधात रान पेटवले. महिला आयोगाने तातडीने शुक्रवारी त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

काय आहे प्रकरण

सत्संगात चेंगराचेंगरी झाल्यानंतर महिला आयोग उत्तरप्रदेशमधील हाथरसमध्ये दाखल झाला होता. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा 3 जुलै रोजी घटनास्थळी गेल्या होत्या. या विषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर दिसला. त्यात एक व्यक्ती शर्मा यांच्या डोक्यावर छत्री धरुन उभा होता. त्या व्हिडिओवर पत्रकार निधी राजदान यांनी टीका केली. शर्मा यांना छत्री सुद्धा हातात धरता येत नाही का? असा सवाल त्यांनी विचारला होता.

हे सुद्धा वाचा

महुआ यांनी केली खालची टीका

तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पत्रकारच्या कमेंटवर अश्लाघ्य प्रतिक्रिया दिली. ‘ती आपल्या बॉसचा पायजमा पकडण्यात गुंतलेली आहे’, अशी अश्लाघ्य टिप्पणी मोईत्रा यांनी केली. त्यानंतर वाद उफळला. ही टिप्पणी अत्यंत अपमानजनक असल्याचे सांगत राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्ली पोलिसांत तक्रार दिली.मोईत्रांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 79 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

मी तर नादियात, या अटक करा

तर खासदार मोईत्रा यांच्या अजून एका ट्विटने वादाला हवा मिळाली. ‘मला अटक करायची असेल तर मी नादियात’, असल्याचे आव्हानच त्यांनी दिल्ली पोलिसांना दिले. महिला आयोगाच्या आदेशावर लागलीच कारवाई करा. पुढील तीन दिवस आपली गरज असेल आणि अटक करायचे असेल तर नादियात या, अशी प्रतिक्रिया महुआ यांनी दिली होती.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.